शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:34 IST

दारूच्या नशेत वर्तकनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवरून रविवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या बेतात असलेल्या सुरेश भास्कर गोडेराव (३४, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाचवले.

ठाणे : दारूच्या नशेत वर्तकनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवरून रविवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या बेतात असलेल्या सुरेश भास्कर गोडेराव (३४, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाचवले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी किरकोळ काम करणारा सुरेश वर्तकनगरनाक्यावरील ‘माळवे हाउस’ या सहा मजली इमारतीत आत्महत्येच्या उद्देशाने १२ आॅगस्ट रोजी दुपारी शिरला. तसे त्याने गेटवरच एका रहिवाशाला सांगितले. ही माहिती मिळताच काही रहिवाशांनी ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. तेथून वर्तकनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. वर्तकनगर बीट क्रमांक-१ चे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप अलगुडे आणि नवनाथ ढाकणे यांना हा प्रकार काही नागरिकांनी सांगितला. ते कळताच या दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता या इमारतीकडे धाव घेतली. त्यावेळी इमारतीच्या खालून अनेकजण त्याला ‘मागे हो, उडी टाकू नको’, असे सांगून आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत होते. तोपर्यंत अलगुडे आणि ढाकणे यांनी गच्चीवर जाऊन सुरेशला ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला नाव आणि पत्ता सांगण्यासही नकार दिला. मात्र, नंतर स्वत:ची आणि कुटुंबाची माहिती दिली.कुटुंबीयही आश्चर्यचकितत्याची आई जनाबाई आणि मोठा भाऊ नारायण गोडेराव यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. कोणताही वाद नसताना त्याने असे का पाऊल उचलले, याबाबत कुटुंबीयांनीही आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिसnewsबातम्या