शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हे सुरू, महापालिका आयुक्तांनी दिले सहाय्यक आयुक्तांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 17:34 IST

Bird Flu News : ठाण्यात बर्ड फ्ल्युमुळे चार पक्षांचा मृत्यु झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

 ठाणे  - ठाण्यात बर्ड फ्ल्युमुळे चार पक्षांचा मृत्यु झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर आता ठाणो महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भातील जबाबदारी दिली असून त्यानुसार सोमवार पासून चिकन शॉपमधील कोबंडय़ाचा सव्र्हे सुरु झाला आहे. यामध्ये कोबंडय़ाना काही आजार आहे का?, मृत कोबंडय़ा कुठे आहेत का?, याची पाहणी केली जाणार आहे. तसेच कोंबडय़ा मृत अवस्थेत आढळल्यास त्यांचे नमुने तपासणी करुन शासनाच्या निर्देशानुसार त्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले आहेत.मागील आठवडय़ात घोडबंदर भागात १६ पक्षांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर आता त्यातील चार पक्षांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता खबरदारीच्या दृष्टीकोनातून पालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. या संदर्भात सोमवारी सकाळी आयुक्त डॉ. शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची तसेच आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील चिकन शॉपचा सव्र्हेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.या आदेशानंतर तत्काळ दुपार पासून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सव्र्हे करण्याचे काम ९ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकामार्फत सुरु झाले आहे. चिकन शॉपमधील कोंबडय़ाचा सव्र्हे केला जाणार असून त्यांना कोणता आजार आहे का?, याची माहिती घेतली जाणार आहे. शिवाय एखाद्या ठिकाणी मृत अवस्थेत कोंबडी आढळली तर तिचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार असून त्यानंतर त्या कोंबडय़ांची शासकीय निर्देशानुसार विल्हेवाट लावण्याचे आदेशही आयुक्तांनी संबधींत विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. अद्याप एकाही कोंबडीचा मृत्यु नाहीठाण्यात १६ पक्षांचा मृत्यु झाला असला तरी त्यामध्ये एकाही कोंबडीचा समावेश अद्याप झालेला नाही. तसेच पालिकेकडे देखील अद्यापही तशा प्रकारची एकही तक्रार आलेली नाही. परंतु कोंबडय़ामध्ये बर्ड फ्ल्युचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने हे सव्र्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आल्याचेही पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूthaneठाणे