शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरात ‘सरप्राइज नाकाबंदी’, बीट मार्शलसह कोणत्याही वेळी पेट्रोलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:06 IST

वाढत्या चो-या आणि छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे शहर आयुक्तालयातील वागळे इस्टेट परिमंडळामध्ये ‘सरप्राइज पेट्रोलिंग’ सुरू केले आहे.

जितेंद्र कालेकर

ठाणे : वाढत्या चो-या आणि छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी ठाणे शहर आयुक्तालयातील वागळे इस्टेट परिमंडळामध्ये ‘सरप्राइज पेट्रोलिंग’ सुरू केले आहे. बीट मार्शलच्या गस्तीबरोबर ‘सरप्राइज नाकाबंदी’ही सुरू झाल्याने गुन्हेगारांवर वचक राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी ‘लोकमत’ला दिली.एकीकडे नवरात्रोत्सवानिमित्त रात्री बाहेर पडणारा महिलावर्ग, तर दुसरीकडे नोकरी, व्यवसायानिमित्त कामावर असलेली पुरुष मंडळी. या दोन्हींचा गैरफायदा घेत चोरट्यांनी वागळे इस्टेटमधील किसननगर, वर्तकनगरमधील लोकमान्यनगर, रामचंद्रनगर तसेच कापूरबावडी, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील घोडबंदर रोड, मानपाडा, वसंतविहार, शिवाईनगर, बाळकुम आदी परिसरांत रात्री मोर्चा वळवल्याने चोºयांचे प्रमाण वाढले आहे. लोकमान्यनगर येथे तर दोन दिवसांपूर्वी रात्री घराची कडी काढून घरात शिरलेल्या चोरट्याने गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला.वरील दोन्ही घटनांमधील चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून वर्तकनगर आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडून याबाबतचा तपास सुरू आहे. सायंकाळी किंवा सकाळी फेरफटका मारणाºया महिलांची मंगळसूत्र तसेच सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्येही पुन्हा वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी काही टवाळखोर तरुणांकडून दांडियाच्या निमित्ताने तरुणींची छेड काढण्याचेही प्रकार घडतात. या सर्वच पार्श्वभूमीवर वागळे विभागातील वर्तकनगर, वागळे इस्टेट, कापूरबावडी, चितळसर, श्रीनगर, कासारवडवली येथे सरप्राइज पेट्रोलिंग सुरू केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस