शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या सुरेखा गावंडे यांची ‘कोळ्याची पोर’ अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 03:02 IST

समुद्रकाठचे नागरिक दैनंदिन जीवन जगताना सदैव आव्हानांना, संकटांना तोंड देत असतात. समुद्र हेच त्यांचे श्रद्धास्थान असते.

- जान्हवी मोर्येकल्याण : समुद्रकाठचे नागरिक दैनंदिन जीवन जगताना सदैव आव्हानांना, संकटांना तोंड देत असतात. समुद्र हेच त्यांचे श्रद्धास्थान असते. समुद्राकाठी राहणाऱ्या कोळी समाजातील मुली यादेखील अत्यंत साहसी असतात. ‘कोळ्याची पोर’ या कवितेतून सुरेखा गावंडे यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या कवितेचा यंदाच्या वर्षी नवीन आठवीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.गावंडे या कल्याणच्या काटेमानिवली, हनुमाननगर परिसरात राहतात. त्या ३६ वर्षांपासून ठाणे येथे एमटीएनएलमध्ये नोकरी करत आहेत. वाचन फारसे नसले तरी रेल्वेतून प्रवास करताना त्या खिडकीतून बाहेरचे निरीक्षण करतात. त्यातूनच त्यांना कविता सुचतात. इयत्ता आठवीत असल्यापासूनच कविता लिहिण्यास सुरुवात केल्याचे त्या म्हणाल्या.गावंडे म्हणाल्या, १९९३ मध्ये त्यांचे पहिले पुस्तक ‘सेजलची दंगल’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर, एकेक साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम ‘आकाशवाणी’वर सातत्याने सुरू असतात. ‘आकाशवाणी’वर त्यांची पाच गाणी मुलांकडून गाऊन घेतली आहेत. ती गाणी ‘गंमतजंमत’मध्ये सुरू असतात. त्यांच्या निवृत्तीला अवघे एक वर्ष बाकी आहे. चित्रपटासाठी गीते लिहिण्याची त्यांची इच्छाही काही अंशी पूर्ण झाली आहे. एका आगामी चित्रपटासाठी नुकतीच त्यांनी तीन गाणी लिहिली आहेत. त्या तीन गाण्यांचे रेकार्डिंग झाले आहे. ‘सेजलची दंगल’ या पुस्तकासाठी कुसुमाग्रजांच्या शुभेच्छा त्यांना लाभल्या आहेत.गावंडे यांचे पती केडीएमसीमध्ये आस्थापना विभागात कार्यरत होते. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्या एकत्रित कुटुंबात राहत आहेत. पाठ्यपुस्तकात कविता येण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नव्हते. फक्त कविता पुण्याला पाठवली होती. त्यानंतर त्यांची ‘कोळ्याची पोर’ कविता आठवीच्या अभ्यासक्रमासाठी निवडल्याचे फोनवरून कळवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. कविता माध्यमिक शाळेच्या इयत्ता आठवीच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लावली गेली आहे. याचा खूप आनंद गावंडे यांना झाला आहे.- कल्याण येथील रहिवासी सुरेखा गावंडे यांच्या ‘सह्याद्रीची लेक हिमालयाच्या कुशीत’ या पुस्तकाला सृजन साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ‘साक्षी’, ‘सांजवेळ’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आतापर्यंत त्यांचे पाच काव्यसंग्रह, एक प्रवासवर्णन, ‘पहिला पाऊस, पहिले प्रेम’ हा मराठी गीतांचा अल्बम प्रकाशित झाला आहे. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली आहे.

टॅग्स :thaneठाणे