शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर प्रकरणात ठाणे पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 05:31 IST

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये, ठाणे पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये, ठाणे पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. न्यायालयाचा अंतिम आदेश पुढील सुनावणीला येण्याची शक्यता आहे.ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ने उघडकीस आणलेल्या बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये, गुप्तहेर रजनी पंडित, काही खासगी गुप्तहेर व एका पोलीस कर्मचाºयासह १२ आरोपींना अटक केली. पोलिसांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील रिझवान सिद्दिकी यांना १६ मार्च रोजी अटक केली होती. ठाणे न्यायालयाने अ‍ॅड. सिद्दिकी यांना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, अ‍ॅड. सिद्दिकी यांच्या अटकेस त्यांच्या पत्नी तसनीम सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने अ‍ॅड. सिद्दिकी यांची अटक अवैध ठरवून, त्यांना सोडण्याचे आदेश २१ मार्च रोजी दिले.उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पोलीस कोठडीची मुदत संपण्यापूर्वीच अ‍ॅड. सिद्दिकी यांची सुटका करण्याची नामुश्की पोलिसांवर ओढावली होती. या आदेशामध्ये उच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांवर कठोर ताशेरे ओढले होते. तद्वतच अ‍ॅड. सिद्दिकी यांना अटक करताना कायद्याचे पालन न केल्याने पोलिसांची चौकशी करण्याचे आदेशही दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी पोलिसांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली.>चार आठवड्यांचा अवधीसर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅड.सिद्दिकींना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे. प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात त्यांना त्यांचे म्हणणे सादर करावे लागणार आहे. या वेळी ठाणे पोलिसांची बाजू महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी मांडली. म्हणणे ऐकल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने ठाणे पोलिसांची चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली.

टॅग्स :CDR caseसीडीआर प्रकरण