शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश ठरवला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:15 IST

न्यायालयाने क्लीन चिट दिलेली नाही - सुवर्णा

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : सर्वोच्च न्यायालयाने ७११ क्लब प्रकरणी आदेश रद्द ठरवला असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकारांना दिली. मुंबई उच्च न्यायालयात आम्हाला प्रतिवादी न करता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. तो आदेश सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा ठरवल्याचे मेहता म्हणाले. मीरा रोडच्या ७११ क्लब व तारांकित हॉटेलप्रकरणी कांदळवन ऱ्हासाचे दाखल अनेक गुन्हे असताना महापालिकेने नियमात नसताना बांधकाम परवानगी दिल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. एका याचिकेवर सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करावा, असे आदेश दिले होते. जानेवारी २०२१ मध्ये तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवल्याने अनेक तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले होते. तर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास गेल्यानंतर मेहतांसह सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

मेहता यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने माझ्यासह सेव्हन इलेव्हन कंपनी व यांच्यावर मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आमच्याकडे सर्व परवानग्या असल्याने तसेच काही केले नसल्याने पोलीस तपासात काही निष्पन्न होणार नाही याचा आम्हाला विश्वास होता. परंतु आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास दिल्याचे कळल्यावर हे राजकीय दबावाखाली केले की व्यक्तिगत दबावाखाली हे समजले नाही. शेवटी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले, असे मेहता म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले की, आम्ही काही सांगत नाही की त्यात तथ्य नाही. पण तथ्य आहे तर परत न्यायालयात जा प्रतिवादी करा.

न्यायालयाने क्लीन चिट दिलेली नाही - सुवर्णा७११ क्लब प्रकरणातील एक तक्रारदार रोहित सुवर्णा म्हणाले की, न्यायालयाने मेहता वा संबंधितांना क्लीन चिट दिलेली नाही. जर मेहता म्हणतात की, त्यांनी काहीच चुकीचे केले नाही, मग ते चौकशीला घाबरले का? तपास होऊ द्यायचा होता, मग सत्य काय ते सर्वांसमोर आले असते.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे