भिवंडी : वॉर्डामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भिवंडीत मारहाणीच्या घटनांना सुरवात झाली आहे. पद्मानगर भागात शिवसेना नगरसेवक नित्यानंद (वासू अण्णा) नाडर यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला झाला. अनिल दासी असे त्याचे नाव आहे. तो नाडर यांच्या कार्यालयात कामाला असून वॉर्डातील प्रश्न मार्गी लावण्याचे काम करतो. रविवारी रात्री त्याला अनोळखी मोबाईलवरून फोन आला. बालाजी व्यायामशाळा येथील गटारीवरील स्लॅब तुटल्याची तक्र ार करून तो पाहण्यासाठी त्याला बोलावले. दासी तेथे पोचताच तोंडाला रूमाल बांधलेल्या चार व्यक्तींनी त्याला गाडीवरून खाली पाडले. डोक्यावर लोखंडी रॉडने फटका मारून ते पसार झाले. दासी उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूचा दरवाजा पहाटे पाचच्या सुमारास तोडून एक व्यक्ती रूग्णालयात शिरण्याचा प्रयत्न करीत असल्याने वार्डबॉयने आरडाओरड केली. त्यानंतर पुन्हा गोंधळ झाला. (प्रतिनिधी)
नगरसेवकाच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: January 10, 2017 06:46 IST