शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या पत्त्याद्वारे आधार, बँक खाते; मीरा रोडमधील घटना : यंत्रणेने नीट खातरजमा केलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:35 IST

दुस-याच व्यक्तीच्या पत्त्यावर एका व्यक्तीने स्वत:च्या वाहनचालक परवान्यापासून आधारकार्ड, रिक्षापरवाना तसेच बँकेत खाते उघडल्याचा प्रकार मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला आहे. विशेष म्हणजे परवाना वा ओळखपत्र देताना एकाही यंत्रणेने पत्ता खरा आहे का, याची पडताळणी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही नुकताच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा प्रकार उघड झाला.

मीरा रोड : दुस-याच व्यक्तीच्या पत्त्यावर एका व्यक्तीने स्वत:च्या वाहनचालक परवान्यापासून आधारकार्ड, रिक्षापरवाना तसेच बँकेत खाते उघडल्याचा प्रकार मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला आहे. विशेष म्हणजे परवाना वा ओळखपत्र देताना एकाही यंत्रणेने पत्ता खरा आहे का, याची पडताळणी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही नुकताच बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा प्रकार उघड झाला.मीरा रोडच्या कनकिया भागात पोलीस ठाण्याजवळ शिवम पॅलेस नावाची इमारत आहे. या इमारतीत राजबहादूर यादव राहतात. शनिवारी सकाळी त्यांच्या घरी टपाल घेऊन पोस्टमन आले. अपना बँकेचे एटीमएम त्यात असले, तरी ते खान मोहम्मद रशीद इलियास या नावाने होते. १२ वर्षांपासून कुटुंबीयांसह यादव येथे राहत असताना रशीद या भलत्याच व्यक्तीच्या नावाने त्यांच्या पत्त्यावर बँकेचे एटीएमकार्ड आल्याने यादव यांनी अपना बँकेची मीरा रोड शाखा गाठली.बँकेच्या व्यवस्थापकाने रशीद याचे बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यासाठी त्याने वाहनपरवाना व आधार ओळखपत्र दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्या दोन्हींवरही यादव यांच्याच घरचा पत्ता होता. पत्तापडताळणी वा सोसायटीचे पत्र, मेन्टेनन्स बिल आदी काहीच न घेता ‘तुम्ही खाते उघडले तरी कसे’ असे यादव यांनी बँक व्यवस्थापकास विचारले असता त्यांनी आमच्या नियमानुसार आधार ओळखपत्र पुरेसे असल्याचे सांगितले.दरम्यान, बँक व्यवस्थापकाने रशीद याला भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बँकेत बोलावून घेतले. रशीद याने मुंब्रा येथील वेलकम मोटार ट्रेनिंग स्कूल व दलालाच्या माध्यमातून ३२ हजार रुपये खर्च करून वाहनपरवाना काढून घेतला होता, असे सांगितले. मग, त्या परवान्याच्या आधारेच अन्य आधार, बँक खाते, रिक्षापरवाना आदी काढून घेतल्याचे त्याने कबूल केले.बँक व्यवस्थापकाने याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यास नकार दिल्यावर यादव यांनीच रशीदला घेऊन पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची भेट घेऊन सर्व घटना सांगत कारवाई करण्याची मागणी केली. पाडुळे यांच्या सांगण्यानुसार आपण लेखी तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दिला आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड