शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

सर्वसामान्यांना आडोशाचाच सहारा; पालघरकरांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 03:25 IST

एकही सुलभ शौचालय नसताना होणार दंड वसूली

- हितेन नाईकपालघर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका, शौच, थुंकल्यास तात्काळ दंड वसूल करण्याची मोहीम आता नगरविकास विभागाच्या आदेशान्वये पालघर नगरपरिषदेकडून राबविण्याची शक्यता आहे. परंतु नगरपरिषदेने आज पर्यंत शहरात एकही सुलभ सार्वजनिक शौचालयाची उभारणीच केली नसल्याने मिळेल त्या आडोशाचा सहारा सर्वसामान्यांना घ्यावा लागत असल्याने कोणत्या अधिकाराने नगरपरिषद दंड वसुली करणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यातील नगर पालिका, महानगर पालिका, क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्यास १०० रु पये,शौचास बसल्यास ५०० रुपये, थुंकल्यास १०० रुपये, घाण टाकल्यास १५० रुपये जागीच दंड म्हणून वसूल करण्यात यावेत असे आदेश नगरविकास विभागाने शुक्र वारी काढले. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील कलम १५ नुसार नगरपालिका, महानगर पालिका ह्यांना स्वच्छते बाबतच्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्ती,संस्थांना दंड करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले आहेत.पालघर नगरपरिषदेची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली असून पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन ४ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत २० वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतरही पालघर शहरात एकही सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना यश मिळालेले नाही. पालघर स्टेशन ते मनोर, माहीम, टेम्भोडे, बोईसर अशा चारही दिशेच्या प्रमुख रस्त्यावर एकही शौचालय नसल्याने पालघर शहरात आलेल्या नागरिकांना आडोश्या शिवाय अन्य कुठलाही पर्याय शिल्लकच ठेवण्यात आलेला नाही.प्रथम पायाभूत सोयी करा, मगच कारवाई करा - नगराध्यक्षांचा टोलापालघरचा शुक्र वार बाजार मागील अनेक वर्षांपासून माहीम रस्त्यावर भरवला जात असून मुंबई, भिवंडी, मुंब्रा, गुजरात आदी भागातून मोठ्या प्रमाणात विक्रेते आपली उत्पादने विक्र ीसाठी घेऊन येत असतात. त्याच्या खरेदी साठीही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. अशावेळी नगरपालिका लाखो रुपयांचा कर वसूल करीत असताना मात्र त्या जमलेल्या ८ ते १० हजार लोकांना पिण्याचे पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचार आदी कुठलीही व्यवस्था नगरपरिषदे कडून करण्यात येत नाही.नगर विकास विभागाने प्रथम कर वसूल करणाºया नागरिकांना सुलभ शौचालय, चांगले रस्ते, कचराकुंडी, पिकदानी आदी सोयीसुविधा निर्माण करण्याचे सक्तीचे आदेश नगरपालिका, महानगर पालिका यांना दिले आहेत. त्यामुळे पहिले पायाभूत सुविधा निर्माण करा आणि नंतरच कारवाईचे बघा आसा टोला नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी नागरविकासच्या आदेशावर लगावला.पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने हजारो लोकांचे मोर्चे नेहमी येत असतात. अशावेळी जव्हार, मोखाडा आदी भागातून आलेल्या मोर्चेकºयांसाठी एकही सुलभ शौचालय नाही. अशावेळी नागरिकांना आडोश्या शिवाय कुठलाही पर्याय नसल्याने शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरातील विविध पाडे आदी भागात शौचालये उभारली आहेत. कारवाई साठी फिरती पथके नेमण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेऊ.- उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष, पालघरशहरात एकही सुलभ शौचालय नाही. नगर परिषद करापोटी लाखो रु पये वसुली करते. त्यामुळे पहिले उपाय योजना निर्माण करा नंतरच दंड वसुलीचे बघा.- अरु ण माने, माजी नगरसेवक

टॅग्स :palgharपालघर