सर्वसामान्यांना आडोशाचाच सहारा; पालघरकरांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:25 AM2018-09-16T03:25:09+5:302018-09-16T03:25:27+5:30

एकही सुलभ शौचालय नसताना होणार दंड वसूली

Support to the common people; Palgharak's sorrow | सर्वसामान्यांना आडोशाचाच सहारा; पालघरकरांची व्यथा

सर्वसामान्यांना आडोशाचाच सहारा; पालघरकरांची व्यथा

Next

- हितेन नाईक

पालघर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका, शौच, थुंकल्यास तात्काळ दंड वसूल करण्याची मोहीम आता नगरविकास विभागाच्या आदेशान्वये पालघर नगरपरिषदेकडून राबविण्याची शक्यता आहे. परंतु नगरपरिषदेने आज पर्यंत शहरात एकही सुलभ सार्वजनिक शौचालयाची उभारणीच केली नसल्याने मिळेल त्या आडोशाचा सहारा सर्वसामान्यांना घ्यावा लागत असल्याने कोणत्या अधिकाराने नगरपरिषद दंड वसुली करणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यातील नगर पालिका, महानगर पालिका, क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्यास १०० रु पये,शौचास बसल्यास ५०० रुपये, थुंकल्यास १०० रुपये, घाण टाकल्यास १५० रुपये जागीच दंड म्हणून वसूल करण्यात यावेत असे आदेश नगरविकास विभागाने शुक्र वारी काढले. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील कलम १५ नुसार नगरपालिका, महानगर पालिका ह्यांना स्वच्छते बाबतच्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्ती,संस्थांना दंड करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले आहेत.
पालघर नगरपरिषदेची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली असून पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन ४ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत २० वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतरही पालघर शहरात एकही सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना यश मिळालेले नाही. पालघर स्टेशन ते मनोर, माहीम, टेम्भोडे, बोईसर अशा चारही दिशेच्या प्रमुख रस्त्यावर एकही शौचालय नसल्याने पालघर शहरात आलेल्या नागरिकांना आडोश्या शिवाय अन्य कुठलाही पर्याय शिल्लकच ठेवण्यात आलेला नाही.

प्रथम पायाभूत सोयी करा, मगच कारवाई करा - नगराध्यक्षांचा टोला
पालघरचा शुक्र वार बाजार मागील अनेक वर्षांपासून माहीम रस्त्यावर भरवला जात असून मुंबई, भिवंडी, मुंब्रा, गुजरात आदी भागातून मोठ्या प्रमाणात विक्रेते आपली उत्पादने विक्र ीसाठी घेऊन येत असतात. त्याच्या खरेदी साठीही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. अशावेळी नगरपालिका लाखो रुपयांचा कर वसूल करीत असताना मात्र त्या जमलेल्या ८ ते १० हजार लोकांना पिण्याचे पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचार आदी कुठलीही व्यवस्था नगरपरिषदे कडून करण्यात येत नाही.

नगर विकास विभागाने प्रथम कर वसूल करणाºया नागरिकांना सुलभ शौचालय, चांगले रस्ते, कचराकुंडी, पिकदानी आदी सोयीसुविधा निर्माण करण्याचे सक्तीचे आदेश नगरपालिका, महानगर पालिका यांना दिले आहेत. त्यामुळे पहिले पायाभूत सुविधा निर्माण करा आणि नंतरच कारवाईचे बघा आसा टोला नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी नागरविकासच्या आदेशावर लगावला.

पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने हजारो लोकांचे मोर्चे नेहमी येत असतात. अशावेळी जव्हार, मोखाडा आदी भागातून आलेल्या मोर्चेकºयांसाठी एकही सुलभ शौचालय नाही. अशावेळी नागरिकांना आडोश्या शिवाय कुठलाही पर्याय नसल्याने शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील विविध पाडे आदी भागात शौचालये उभारली आहेत. कारवाई साठी फिरती पथके नेमण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेऊ.
- उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष, पालघर
शहरात एकही सुलभ शौचालय नाही. नगर परिषद करापोटी लाखो रु पये वसुली करते. त्यामुळे पहिले उपाय योजना निर्माण करा नंतरच दंड वसुलीचे बघा.
- अरु ण माने, माजी नगरसेवक

Web Title: Support to the common people; Palgharak's sorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर