शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

बॉलिवूड कलाकारांसह अडीच हजार उच्चभ्रूंना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा, चौघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: March 20, 2024 18:26 IST

बॉलिवूडचे कलाकार तसेच सेलिब्रेटींना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांना मिळाली होती.

ठाणे: बॉलिवूड कलाकार, सेलिबे्रटींसह तब्बल अडीच हजार उच्चभ्रूंना ऑनलाईन घरपोच बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणाऱ्या नशी बाभणीया (३८) याच्यासह चौघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने अटक केल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली. त्यांच्याकडून बनावट आयात विदेशी मद्याच्या तयार बाटल्या आणि आयात विदेशी मद्याच्या विविध ब्रॅन्डच्या रिकाम्या बाटल्या असा २७ लाख ७३ हजार ४०५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

बॉलिवूडचे कलाकार तसेच सेलिब्रेटींना बनावट विदेशी मद्याचा पुरवठा करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांना मिळाली होती. त्याच आधारे  १५ मार्च २०२४ रोजी उत्पादन शुल्क विभागाचे संचालक  डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागीय ठाण्याचे उपायुक्त पवार आणि मुंबईचे अधीक्षक नितीन ष्घुले यांच्या मार्गदर्शनाखाली मद्य निरीक्षक दीपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक राजेंद्र शिर्के, राजू वाष्घ, जवान सुनिल टोपले, अण्णा उडीयार आणि तेजस्वी मयेकर आदींच्या पकाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर ऑनलाईन द्वारे परदेशातील विदेशी मद्य (स्कॉच) विक्रीच्या उद्देशाने ष्घरपोच देण्यात येईल, अशा स्वरुपाच्या जाहिरातीची पडताळणी केली. त्यानुसार या पकाने जुहू तारा रोड, मालाड आणि ठाण्यातील मीरा रोड भागात सापळा रचून एका रिक्षामध्ये आलेल्या बनावट विदेशी मद्याच्या स्कॉचच्या विविध नामांकित कंपन्यांच्या २४ बाटल्या जप्त केल्या. यामध्ये नशी बाभणिया, भरत पटेल (५१), विजय यादव (४५) आणि दिलीप देसाई (६२) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत मालाड आणि मीरा रोड ये आयात विदेशी मद्य बनविण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये  विविध ब्रॅन्डच्या बनावट आयात विदेशी मद्याच्या १२५ तयार बाटल्यांसह बाटल्यांमध्ये मद्य पॅकींगची सामुग्री आणि रिक्षा असा २७ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना बनावट मद्यबॉलीवूडच्या सेलिब्रेटींसह अडीच हजार मद्यपींना ऑनलाईनद्वारे या आरोपींना बनावट विदेशी मद्य ऑनलाईन घरपोच पुरविल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सोशल मिडियावर ऑनलाईनद्वारे मद्यविक्री, निर्मिती आणि वाहतूकीबाबत माहिती असल्यास १८००२३३९९९९९ या टोल फ्री क्रमांकावर आणि ८४२२००११३३ या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा. प्रदीप पवार, उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोकण विभाग, ठाणे.

टॅग्स :thaneठाणे