शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सुनील चव्हाण ठाण्याचे ‘स्मार्ट’ सीईओ; आयुक्तांपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:25 IST

महापालिका आयुक्तांना २५ लाखापर्यंतच खर्चाची कामे करण्याचे अधिकार महाराष्टÑ महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम ७३ (क) अन्वये देण्यात आले आहेत. परंतु, आयुक्तांपेक्षा स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सीईओंना मात्र तब्बल एक कोटी रुपयांपर्यंच्या खर्चाची कामे करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

ठाणे : महापालिका आयुक्तांना २५ लाखापर्यंतच खर्चाची कामे करण्याचे अधिकार महाराष्टÑ महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम ७३ (क) अन्वये देण्यात आले आहेत. परंतु, आयुक्तांपेक्षा स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सीईओंना मात्र तब्बल एक कोटी रुपयांपर्यंच्या खर्चाची कामे करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत आता आयुक्तांपेक्षा स्मार्ट सिटीचे सीईओ सुनील चव्हाण हेच अधिक ‘स्मार्ट’ ठरणार आहेत.टीएससीएलच्या संचालक मंडळाची एक बैठक नुकतीच कंपनीचे अध्यक्ष आणि प्रधान सचिव (महसूल) मनुकुमार श्रीवास्तव यांच्या कार्यालयात झाली. टीएससीएलचे सीईओ तथा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या बैठकीत २९ विविध प्रस्ताव मंजुरीसाठी मांडले होते. त्यात कल्याण डोंबिवली आणि सोलापूर पालिकेतील स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओंना एक कोटी रुपयांपर्यंतचा खर्च स्वत:च्या अधिकारात करण्याची परवानगी देण्यात आली असून त्या धर्तीवर ठाण्यातही असे अधिकार मिळावेत, असा प्रस्ताव होता. त्याला या सभेत मंजुरी मिळाली आहे. दरम्यान या कंपनीची स्थापना झाल्यानंतर त्यावर पालिकेच्या महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि स्थायी समिती सदस्यांना संचालकपद देण्यात आले.या सभेचा अजेंडाच तब्बल चार वेळा बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही तो इंग्रजीत असल्याने त्याचा अभ्यास करण्यासही पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. श्रीवास्तव यांच्यासमवेतची संपूर्ण बैठक मराठीत झाली. मग, अजेंडा इंग्रजीत देण्याचा अट्टाहास का, असा सवाल उपस्थित झाला. पुढील बैठकीपासून अजेंडा मराठीत सादर करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :thaneठाणे