शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेती समृद्ध न झाल्याने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:30 IST

आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे.

डोंबिवली : आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे. जोडधंदे विकसित करून शेती समृद्ध करण्याची रचना २५ वर्षांत झालेली नाही. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.‘चतुरंग प्रतिष्ठान’, डोंबिवली शाखेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्तसंध्या या कार्यक्रमांतर्गत ‘बातमी अशी सापडते, दिसते, करता येते’ या विषयावर गप्पागोष्टीमय मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी माधवाश्रम मंगल कार्यालयात झाला. या वेळी निरगुडकर बोलत होते. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.निरगुडकर म्हणाले, हवामान बदलत आहे, हमीभाव स्थिर नाही. धरण आहे तिथे पाट नाही, पाट आहे तिथे पाणी नाही, पाणी आहे तिथे बियाणे नाही. सोलापुरात तिसºयांदा पेरणीची वेळ आली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. ते कमकुवत मनाचे आहेत, असे बोलले जाते. पण, त्यांना आशेचा एकतरी किरण दिसला पाहिजे. आज ११४ तालुक्यांत १० टक्के पाऊस नाही. अनेक तालुके ओस पडले आहेत. तेथील नागरिक कसे जगणार. खरीप हंगाम गेला. रब्बी हंगामाचे काही माहीत नाही. ५० ते ६० लोक शेतीवर अवलंबून आहेत. हा प्रश्न सामाजिक प्रतिष्ठेचा आहे. मराठा मोर्चाची शिस्त वाखाणण्याजोगी होती. या मोर्चाची मांडणी खोलवर आहे. एवढे आमदार, खासदार अशी मांडणी करता येणार नाही. एवढी सोपी मांडणी करू नका. यांची मांडणी खोलवर आहे.प्रत्येक समाजात काळानुसार बदल झाला पाहिजे. आता शेतकरी होणे, हे शाप आहे. शेतकरी दैन्यावस्थेत जगत असतात. इतके दारिद्रय मी कधी पाहिले नाही.शेतीला लागणाºया पायाभूत सोयीसुविधा जोपर्यंत आपण विकसित करत नाही, तोपर्यंत हा आक्रोश असाच येत राहणार आहे. यामागे अर्थकारण आहे. त्याला कोणताही जातीचा रंग आपण लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.मराठा समाज हा लढवय्या आहे. ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. लाखालाखांचे मराठ्यांचे मोर्चे निघाले तशी इतर समाजांचीही संमेलने झाली. पाटीदारांची आंदोलने झाली, अशी अनेक उदाहरणे देता येतील. कारण, समाजाची अर्थरचना आणि समाजरचना बदलत गेली. शेतीचे तुकडे झाले आणि शेती अव्यवहार्य झाली, असे ते म्हणाले.तेच खरे रियल हिरोचित्रपटातील तारेतारका मला हीरो वाटत नाही. त्यापेक्षा उल्हासनगरमधील प्रांजल पाटील मला रिअल हीरो वाटतात. सैराट चित्रपटात जो मुलगा दाखवला आहे, त्याचे पुढे काय झाले, कोणाला माहीत नाही. पण, सागर रेड्डी नावाच्या मुलाबाबतीत अशीच घटना घडली होती. १८ वर्षांनंतर अनाथालयातून अनुदान मिळत नाही. म्हणून बाहेर पडावे लागते.महाराष्ट्रात १० हजार मुले अनाथाश्रमातून बाहेर पडतात. त्यांच्या पुढील भवितव्याचे काय? सागरला अनाथालयातून बाहेर पडल्यावर चांगली व्यक्ती मिळाली. त्याने इंजिनीअरचे शिक्षण घेतले. परदेशात जाण्याची संधी आली असूनही ती नाकारली. सागरने वयाच्या ३१ व्या वर्षी ४० मुलींचे कन्यादान केले. हे खरे रिअल हीरो आहेत, असे निरगुडकर यांनी नमूद केले.बातमीशी प्रामाणिक असावेवृत्तवाहिन्या बातम्या मनोरंजक करतात, असे आरोप केले जातात. पण, हा माध्यमांचा दोष नाही. प्रेक्षक हे पाहणे बंद करतील, त्या दिवशी वाहिन्या रंजकता बंद करतील. आपण बातमीशी प्रामाणिक असले पाहिजे.विरोधी पक्ष जेव्हा बातम्या उचलत नाही, तेव्हा ते काम आम्हाला करावे लागते. बातम्या करताना धमक्या येत असतात.मात्र, आपण त्यांची जाहिरात करायची नसते. हा या क्षेत्राचा साइड इफेक्ट आहे. ते सहन करण्याची शक्ती तुमच्याकडे पाहिजे. वृत्तवाहिन्या नागरिकांना आधार वाटतात, याकडे निरगुडकर यांनी लक्ष वेधले.