शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

आत्महत्त्या प्रतिबंध करु शकतो : मनोविकृतीतज्ञ परिचारक संदेश धामणीकर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:46 IST

प्रादेशिक मनोरु ग्णालय ठाणे येथे शुक्रवारपासून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरु ग्णालय ठाणे येथे शुक्रवारपासून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहआत्महत्त्या प्रतिबंध करु शकतो : संदेश धामणीकर प्रतिबंध करुया आत्महत्त्येचा, प्रसार करुया मानसीक आरोग्याचा

ठाणे: आत्महत्त्येचा विचार हा कोणत्याही व्यक्तीच्या मनात येऊ शकतो. त्यासाठी वय, लिंग, सुशिक्षित - अशिक्षीत असा भेदभाव नसतो. आत्महत्त्या करण्याची इच्छा एखादी व्यक्ती बोलून दाखवत असेल तर तिचे योग्य समुपदेश केले पाहिजे. आत्महत्त्या प्रतिबंध करु शकतो असे मत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मनोविकृतीतज्ञ परिचारक संदेश धामणीकर यांनी व्यक्त केले.           जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत बुधवारी खोपट येथील एसटी स्टॅण्ड येथे आत्महत्त्या प्रतिबंध या विषयावर धामणीकर यांनी मार्गदर्शन आणि आपल्या व्याख्यानाद्वारे जनजागृती केली. यावषीर्ची थीम प्रतिबंध करुया आत्महत्त्येचा, प्रसार करुया मानसीक आरोग्याचा ही असून या अनुषंगाने विविध ठिकाणी व्याख्याने दिली जात आहेत. आत्महत्त्येचा दोन प्रकार असून त्यात अ‍ॅक्टीव्ह आणि पॅसीव्ह हे आहेत. ज्याच्या मनात फक्त आत्महत्त्येचा विचार येतो आणि ते तो बोलून दाखवतो याला पॅसीव्ह आत्महत्त्या म्हणतात तर ज्या व्यक्तीच्या मनात विचार येतात, तो ते व्यक्त करतो आणि त्याचबरोबर तो आत्महत्त्या करण्याची योजनाही आखतो उदा. फाशी लावून घेणे, उडी मारणे. कोणत्याप्रकारे आत्महत्त्या करता येईल याचा विचार तो व्यक्त करतो त्याला अ‍ॅक्टीव्ह आत्महत्त्या म्हणतात. अशा रुग्णांमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात यावर सांगताना धामणीकर म्हणाले, त्या व्यक्तींमध्ये उदासीनता, नैराश्य येते, कोणत्याही गोष्य्टीत आनंद घेण्याची इच्छा लोप पानते, भविष्याबाबत आशा राहत नाही, माझा जगाला उपयोग नाही अशा प्रकारे नैराश्य येऊन आत्महत्त्येचा विचार मनात येतात. अशा वेळी या रुग्णांना सेल्फ मॅनेजमेंट आणि सिटींग मेडीकल अ‍ॅडव्हाईज या दोन पद्धतीने आत्महत्त्येपासून परावृत्त करता येते. कोणताही रुग्ण हा थेट आत्महत्त्या करत नाही, तो त्याच्या जवळच्या/विश्वासू व्यक्तीकडे ही इच्छा बोलून दाखवतो, अशा व्यक्तीचे सेल्फ मॅनेजमेंटमध्ये समुपदेशन केले जाते. सिटींग मेडीकल अ‍ॅडव्हाईजमध्ये अशी व्यक्ती नातेवाईकांच्या मदतीने मनोरुग्णालयात किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाते त्यांच्याकडे मनातले विचार व्यक्त करते, अशा व्यक्तीला वैद्यकीय सल्ला दिला जातो, तसेच, वेगवेगळ््या थेरपी दिल्या जातात. त्यांच्यात सकारात्मक विचार आणून त्यांचे बहुमुल्य जीवन वाचवता येते असे धामणीकर यांनी सांगितले. मानसीक आरोग्य कसे सुधरावे याबद्दल सांगताना ते म्हणाले, सततच्या ताणतणावामुळे आत्महत्त्येचा विचार मनात येतो. त्यामुळे समतोल आहार, वैयक्तीक स्वच्छता आणि शांत झोप तसेच, नियमीत व्यायामाची गरज आहे. या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे विक्रम गायकवाड यांचे सहकार्य लाभले. यावेळी मनोरुग्णालयाचे व्यवसाय उपचार तज्ज्ञ सुधीर पुरी, जान्हवी केरझारकर, वैशाली लोखंडे व इतर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेmental hospitalमनोरूग्णालयMaharashtraमहाराष्ट्र