शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या काही समस्या सोडवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:04 IST

रवींद्र चव्हाण : डोंबिवलीत वनराई प्रदर्शनाचे उद्घाटन; सामाजिक, आध्यात्मिक कार्याबद्दल मान्यवरांचा गौरव

डोंबिवली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी डोंबिवली हे अस्वच्छ शहर असल्याची टीका केली होती. त्यानंतर, या शहरासाठी काय करता येईल, याचा मी सकारात्मक दृष्टीने विचार करू लागलो. कोणतीही तक्रार न करता त्या कशा सोडविता येतील, याचा विचार केला. त्यामुळे या शहराच्या काही समस्या सोडविण्यात यश आले. प्रत्येकाने आपले जॉबकार्ड तयार केले पाहिजे.

महापालिकेचे कर्मचारी काम करतात की नाही, हे नागरिकांनी पाहिले पाहिजे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.वनराई प्रतिष्ठानने येथील क्रीडासंकुलात भरवलेल्या चौथ्या वनराई प्रदर्शनाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नरेंद्र जाधव, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भानुशाली आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी प्रतिभा बिवलकर, रूपाली शाईवाले, अलका मुतालिक, सुरेखा जोशी यांनी केलेल्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.चव्हाण म्हणाले, ‘डोंबिवली रेल्वेस्थानकावर सर्वाधिक वर्दळ असल्याने प्रथम त्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. स्थानकाच्या बाहेर स्वच्छ अशी वातानुकूलित शौचालये बनविली. स्थानकाच्या भिंती घराच्या भिंतीप्रमाणे सजविल्या. स्थानकात बदल घडावा, यासाठी सतत डीआरएमशी चर्चा केली. त्याचबरोबर शहर कचरामुक्त होण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या. कचराकुंड्यांची जागा साफ राहावी, याकरिता घंटागाडी पाच वेळा तेथे गेली पाहिजे, असा प्रयत्न केला. आपली मानसिकता असल्यास शहर आपोआप स्वच्छ होईल.’ते पुढे म्हणाले, ‘या निवडणुकीत मतदारांनी मला काय करावे, हा धडा दिला आहे. त्यामुळे छोटेमोठे कोणतेही काम असले, तरी ते मी करण्याचा निश्चय केला आहे. डोंबिवलीचा प्रदूषणात चौदावा क्रमांक लागला होता. अनेक सामाजिक संस्थांनी कारखाने हटवा, अशी मागणी केली. तसे केले असते तर ५५ हजार कामगार बेरोजगार झाले असते. डोंबिवली एमआयडीसीला यंदाच्या वर्षी पर्यावरणाचा ‘वसुंधरा पुरस्कार’ मिळाला आहे.’जगन्नाथ पाटील म्हणाले, ‘पूर्वी डोंबिवलीत दोन मजली इमारती होत्या. आता त्यांची जागा टोलेजंग इमारतींनी घेतली आहे. ही बांधकामे अशीच सुरू राहिल्यास सरकारला त्यावर नियंत्रण आणावे लागेल.’राणे म्हणाल्या, ‘शहरात वातावरण प्रदूषित असताना आपल्याला झाडे लावण्याची आणि ती जगविण्याची गरज आहे. आपण ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण, त्यासाठी नागरिकांची साथ मिळत नाही. महापालिकेकडे कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे महापालिकेला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.’मुतालिक म्हणाल्या, ‘आपले जीवन निसर्गावर अवंलबून असल्याने कृषी प्रदर्शनाची आज गरज आहे. अनेक जण सार्वजनिक ठिकाणी घाण करतात आणि मी एकटा बदलून काय होणार, असा विचार करतात. त्यामुळेच पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आज शाळा व संस्कारवर्गांवर येऊन पडली आहे. प्रत्येक ठिकाणी शासन पुरे पडू शकत नाही. नागरिकांनी छोट्याछोट्या गोष्टींतून राष्ट्रभक्ती दाखविण्याची गरज आहे.’पावसामुळे कार्यक्रम रविवारपासूनवनराई प्रतिष्ठानतर्फे कृषी प्रदर्शनादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभ होणार आहेत. परंतु, पावसामुळे दोन दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलले असून, रविवारपासून नियमित कार्यक्रम घेण्यात येतील, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली