शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यात नऊ सेंमीची घुसलेली काडी काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 02:10 IST

श्वासनलिकेच्या अर्ध्याअधिक भागात तब्बल नऊ सेंटीमीटरपर्यंत घुसलेली ही काडी अत्यंत जिकिरीची शस्त्रक्रिया यशस्वी करून काढण्यात आल्याने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या शिरपेचात नवा तुरा खोवला आहे.

- पंकज रोडेकरठाणे : गाडीवरून पडल्याने भिवंडीच्या रमेश गजरे (३५) यांच्या गळ्यात १२ सेंटीमीटर लांबीची लाकडी काडी घुसली. त्यांच्या श्वासनलिकेच्या अर्ध्याअधिक भागात तब्बल नऊ सेंटीमीटरपर्यंत घुसलेली ही काडी अत्यंत जिकिरीची शस्त्रक्रिया यशस्वी करून काढण्यात आल्याने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या शिरपेचात नवा तुरा खोवला आहे. गजरे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा सामान्य (सिव्हील) रुग्णालय प्रशासनाने दिली.भिवंडीच्या अंबाडी परिसरात राहणारे गजरे यांना शुक्रवारी सकाळी अपघात झाला. गाडीवरून पडल्यानंतर रस्त्यावर पडलेली लाकडी काडी त्यांच्या गळ्यात घुसली. गळ्यात नऊ सेंटीमीटरपर्यंत आत काठी घुसल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना त्यांच्या मित्र मंडळींनी भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, गजरे यांना घेऊन त्यांचे नातलग ठाण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. घुसलेली काडी काढण्यापूर्वी त्यांचा सिटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. काठी आत खोलवर घुसलेली असल्याने व जखम गंभीर असल्याने त्यांना तातडीने मुंबईला उपचाराकरिता पाठवण्यात यावे, असे काहींचे मत होते.  मात्र, डॉ. माधवी पंदारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत व गजरे यांच्या जखमेतून अगोदरच झालेला रक्तस्राव पाहून त्यांच्यावर ठाण्यातच जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला. गजरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. ही शस्त्रक्रिया डॉ. माधवी पंदारे, डॉ. विलास साळवे, भूलतज्ज्ञ डॉ. रेश्मा, डॉ. उज्ज्वला केंद्रे, परिचारिका वैशंपायन आदी टीमने यशस्वी केली.शस्त्रक्रियेला लागले दोन तासनऊ सेंटीमीटर लांबीची लाकडी काडी गळ्यात घुसल्याने ती खेचून काढता येणे शक्य नव्हते. घुसलेल्या काडीमुळे गळ्याजवळील महत्त्वाच्या भागांना किती दुखापत झाली, याचा अंदाज येत नव्हता. ती काडी शस्त्रक्रिया करून काढण्याचा निर्णय झाल्यावर त्या शस्त्रक्रियेला साधारणत: दोन तासांचा कालावधी लागल्याचे सूत्रांनी सांगितले. गजरे यांना झालेली जखम बरी होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.गजरे यांच्यावरील शस्त्रक्रिया नक्की गंभीर होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शस्त्रक्रिया यशस्वी केली. अशा प्रकारची अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया करण्याची ही बहुधा रुग्णालयातील पहिलीच वेळ असावी. - डॉ. कैलास पवार,शल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :thaneठाणेMedicalवैद्यकीयdocterडॉक्टर