शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

‘गॅमन इंडिया’चा विषय स्थगितच, सभापतींची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 05:54 IST

केडीएमसीच्या स्थायी समितीची सभा : १६ नोव्हेंबरला होणार चर्चा, सभापतींची माहिती

कल्याण : मलनि:सारण केंद्र उभारणाऱ्या गॅमन इंडिया कंपनीला या नावाऐवजी गॅमन इंजिनीअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स या नावाने बिल अदा करण्याचा प्रस्ताव ३१ आॅक्टोबरच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीस आला होता. त्यावेळी स्थायी समिती सभापती राहुल दामले व शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे यांच्यात खडाजंगी झाली. त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली. स्थायीची सभा सोमवारी याच विषयावर गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, तो विषय स्थगित ठेवून १६ नोव्हेंबरच्या सभेत चर्चेला आणला जाईल, असे दामले यांनी स्पष्ट केले आहे.

‘गॅमन इंडिया’ कंपनी १० वर्षांपासून मलनि:सारण केंद्र उभारत आहे. मात्र, केंद्र उभारूनही सर्व मैला कोपर व जुनी डोंबिवली परिसरातील शेतात तसेच थेट खाडीत सोडला जात आहे. त्यामुळे खाडी प्रदूषित झाल्याचा मुद्दा म्हात्रे यांनी उपस्थित केला होता. त्यावर अधिकाºयांनी मौन बाळगल्याने म्हात्रे संतप्त झाले. त्यामुळे म्हात्रे व दामले यांच्या खडाजंगी झाली. हा विषय सोमवारच्या सभेत स्थगित ठेवण्यात आला. मात्र, त्यावर १६ नोव्हेंबरच्या सभेत चर्चा केली जाईल, असे दामले यांनी स्पष्ट केले.दामले म्हणाले, ‘गॅमन इंडिया’ने काम न करताच बिल अन्य नावाने मागितले आहे. त्याला मंजुरी द्यावी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याचा विषय मंजूर केला जाणार नाही. त्यावर, १६ नोव्हेंबरच्या सभेत सविस्तर चर्चा केली जाईल. अधिकाºयांनीही तेव्हा येताना सविस्तर माहिती घेऊन यावे.’भुयारी गटार योजनेच्या दुसºया टप्प्याला मंजुरी देण्याचा विषय सभेच्या पटलावर होता. मात्र, तो १२५ कोटी रुपये खर्चाचा असल्याने त्याच्या मंजुरीच्या वेळी आयुक्तांनी सभेला उपस्थित असणे आवश्यक आहे. आयुक्त काही कारणास्तव सभेला न आल्याने हा विषय स्थगित ठेवला. तसेच मलंग रोड ते उल्हासनगर हद्दीपर्यंतचा २५ कोटींच्या रस्त्याचा विषयही स्थगित ठेवण्यात आला. पुढच्या सभेत तो मांडला जाणार आहे.‘प्रीमिअर’च्या विकासाला परवानगी कोणाची?२००२ मध्ये महापालिकेतून २७ गावे वगळण्यात आली. त्यावेळी महापालिकेने ग्रामपंचायत तसेच प्रीमिअर कंपनीलाही मालमत्ता थकाबाकीच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, कंपनी बंद आहे. जागेचा व्यवहार होताच देणी दिली जातील, असे कंपनीने महापालिकेस कळवले.सध्या कंपनीने ही जागा एका विकासकाला दिली आहे. कंपनीकडून जकातीपोटी १२ कोटी, तर मालमत्ताकरापोटी चार कोटी येणे आहे. ते भरता विकासकाम कसे सुरू झाले. महापालिकेने थकबाकीदार कंपनीला विकासाची परवानगी कशी दिली, असा सवाल शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.कंपनीचा परिसर कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये येत आहे. त्यामुळे या परवानग्या एमएमआरडीएने दिल्या असाव्यात, असे प्रशासनाने सांगितले. परंतु, कंपनी थकबाकी भरत नसेल तर, दिलेली पवानगी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका