शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे सर्व्हेक्षण सुरू - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:21 IST

डोंबिवली: रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांच्या जिविताला धोका आहे, त्यासाठीच गर्दी, दाट वस्तीच्या ठिकाणे अशा ठिकाणच्या एमआयडीसी क्षेत्रातील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचा सर्व्हे सुरु आहे.

डोंबिवली: रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांच्या जिविताला धोका आहे, त्यासाठीच गर्दी, दाट वस्तीच्या ठिकाणे अशा ठिकाणच्या एमआयडीसी क्षेत्रातील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचा सर्व्हे सुरु आहे. त्या सर्व्हेमध्ये प्राधान्याने डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांचा समावेश आहे, त्याचा अहवाल आल्यानंतर त्या सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने देसाई डोंबिवलीत आले होते, त्यावेळी त्यांनी लोकमतला माहिती दिली. प्रोबेस या रासायनिक कंपनीत स्फोट झाला. त्यावेळी विविध घोषणा करण्यात आल्या होत्या, त्यामुळे औद्योगिक सुरक्षा यंत्रणा बळकट होईल असे वाटले होते, पण प्रत्यक्षात तसे झालेले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी परिसरात कमी अधिक प्रमाणात अपघाताच्या घटना घडतच आहे, त्यासाठी सर्व्हे होणे आवश्यक असून ते काम जोमाने सुरु आहे. त्या स्फोटानंतर कारणमीमांसा करणारी समिती नेमली होती त्या समितीचे काम अद्याप बाकी असून लवकरच तो अहवाल समोर येइल असेही देसार्इंनी स्पष्ट केले.एमआयडीसीच्या बहुतांशी सर्वच ठिकाणच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली आहेत. ती काढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अतिक्रमण विरोधी पथक, स्थानिक सुरक्षा यंत्रणा यांच्यावर अवलंबुन रहावे लागते. पण आता तसे होणार नाही. एमआयडीसी स्वत:चे अतिक्रमण विरोधी पथक तयार करत असून लवकरच ते सर्व ठिकाणच्या एमआयडीसी भागात कार्यरत होणार असल्याचे देसाई म्हणाले.एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची चाळण झालेली असून ते रस्ते स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावेत की, एमआयडीसीने करावेत असा युक्तीवाद सातत्याने करण्यात येत असतो, आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो. त्यावर कर स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यायचा आणि रस्ते एमआयडीसीने करायचे अशी मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांची असता कामा नये. सगळयाच ठिकणी ही प्रमुख अडचण असून स्थानिक स्वराज्य संस्थानीच एमआयडीसी हद्दीतील रस्ते चांगले ठेवायला हवेत. सेवा कर (सर्व्हीस टॅक्स) एमआयडीसी घेते, पण मालमत्ता कर नाही, याची सगळयांनी नोंद घ्यावी असेही ते म्हणाले. त्यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक राजेश मोरे, अ‍ॅड. सुदीप साळवी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाdombivaliडोंबिवली