शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सावरकर विरोधाचा प्रतिवाद करण्यासाठी अभ्यास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:40 IST

सच्चिदानंद शेवडे : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवली : विरोध करणाऱ्यांनाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पटले असते; मात्र त्यांचे हिंदुत्व आड येते. आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असल्याने विरोधकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे बुद्धिवाद आणि विज्ञानवादी सावरकरांची गाळीव वाक्ये घेऊ न त्यातून लोकांसमोर मर्यादित सावरकर मांडण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी तरुणांनी सावरकर विचारांचा अभ्यास करून उत्तर दिले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली आणि पै फे्र ण्ड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय जोगलिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर- आक्षेप आणि खंडन’ पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवारी टिळकनगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात पार पडला. त्यावेळी शेवडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पै फ्रेण्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्रीकांत पावगी, अक्षय जोग आदी उपस्थित होते.

शेवडे म्हणाले की, सावरकरांना जाऊन अर्धशतक झाले आहे. तरीही, त्यांचे विचार आणखी लोकांपर्यंत जात आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार सत्तेत आहे. पूर्वी प्रिंट मीडिया, लिखाणाच्या क्षेत्रात डाव्या विचारांचे प्राबल्य होते. आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येउजव्या हातांचे प्राबल्य असल्याने विरोधकांना जशास तशी उत्तरे मिळत आहे. सावरकर नास्तिकवादी कसे होते, हे सांगण्यासाठी सावरकरांचा बुद्धिवाद आणि विज्ञानवाद यातील सोयीस्कर वाक्ये निवडून ती लोकांसमोर मांडली जातात. त्यांना छेद द्यायचा असल्यास सावरकर वाचले पाहिजेत. एखादी गोष्ट नाकारणे सोपे असते; पण ती स्वीकारली तर अभ्यास करावा लागतो. त्यामुळे सोशल मीडियावर सावरकरांच्या विचारांना स्वीकारणारी तरुण मंडळी गोंधळलेली दिसते, असे त्यांनी सांगितले.

शेवडे यांनी अक्षय यांचे कौतुक करताना तरुण लेखकांनी संदर्भ देऊन लिखाण केले पाहिजे. आज समाजाला सावरकरांच्या विचारांची अधिक गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.

विशेष घटना, दुर्मीळ छायाचित्रांचा उल्लेखअक्षय जोग म्हणाले की, सावरकरांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे वाचन केल्यावर आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली. त्यानंतर, झपाट्याने सावरकर चरित्र वाचण्यास सुरुवात केली. पुस्तकांत आतापर्यंत घेतलेल्या आक्षेपांचे सप्रमाण खंडन केले आहेच, शिवाय सावरकरांच्या जीवनातील काही विशेष घटनांचा, दुर्मीळ छायाचित्रांचा आणि त्यांच्यावरील इतर देशांत प्रकाशित झालेल्या साहित्याचा उल्लेखही पुस्तकांत संदर्भ म्हणून केलेला आहे.