शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या यादीवर विद्यार्थ्यांची नजर; ठाण्यातील महाविद्यालयांचाही कटआॅफ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:11 IST

दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

ठाणे : दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उद्या (गुरुवारी) अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होणार असून ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ एक ते दोन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.मुंबईप्रमाणेच ठाण्यातीलही प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. निकाल लागल्यावर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरताना विद्यार्थी सर्वच प्रमुख महाविद्यालयांच्या गतवर्षीच्या कटआॅफची शोधाशोध करतात आणि त्यानुसारच महाविद्यालयांना पसंतीक्रम देतात. यंदा चांगल्या निकालामुळे सर्वच महाविद्यालयांचा कटआॅफ वाढण्याची शक्यता आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाºयांची संख्या मोठी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच लिस्टमध्ये प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी धाकधूक आहे. वाढत्या गुणवत्तेबरोबर महाविद्यालयांच्या प्रत्येक शाखेच्या कटआॅफमध्ये वाढ होते आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम राहिली, तर अनेक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसºया मेरिट लिस्टवर, तर काहींना तिसºया मेरिट लिस्टपर्यंतही वाट पाहावी लागू शकते, असे मत काही प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.यंदाच्या दहावीच्या निकालात ८५ ते ९५ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ किमान दोन टक्क्याने वाढणार, हे नक्की. त्यामुळे ८५ ते ९५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना तरी पहिल्याच मेरिट लिस्टमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची शक्यता कमी आहे.- डॉ. चंद्रशेखर मराठे, प्राचार्य, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय

टॅग्स :thaneठाणे