शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाइन होणाऱ्या परीक्षेमुळे विद्यार्थी तणावात, पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:43 IST

कोरोनाची धास्ती : सरकारकडून आधीपासूनच संभ्रमाचे वातावरण

स्नेहा पावसकर ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा काही शहरे लाॅकडाऊनच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्याने बहुतांश परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच वर्षभर प्रत्यक्ष शाळा नसल्याने अभ्यासाची नसलेली लिंक, परीक्षेबाबतचा गोंधळ आणि आता परीक्षेसाठी बाहेर पडताना कोरोनाची धास्ती या सगळ्यांमुळे विद्यार्थी तणावात आहेत.

कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला म्हणून मागील महिन्यापासून शासनाने ९ वी ते १२ वीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू केल्या. त्यानंतर ५ वी ते ८ वीच्या शाळाही काही जिल्ह्यांत सुरू करण्यात आल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुन्हा काही जिल्ह्यांत शाळा ६ मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. 

ग्रामीण ठाणे जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळा पुन्हा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले.  मात्र आता त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमित झाले आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या परत वाढते आहे. परीक्षा एप्रिल मे महिन्यात आहे. तोपर्यंत काय स्थिती असेल माहीत नाही. मात्र, अशा धोकादायक स्थितीत मुलांना परीक्षेसाठी घराबाहेर पाठवणे तरी धोक्याचे वाटते. येत्या महिनाभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.- मंजुळा रेळे, पालक

वर्षभरात अभ्यास जसा ऑनलाइन झाला किंवा इतर काही इयत्तांच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या तसेच दहावीच्या परीक्षाही ऑनलाइन घेणे शक्य आहे का, हे शासनाने पडताळून पाहून नंतरच निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. - हिमानी सवाखंडे, पालक

बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय तसा चुकीचा नाही. मात्र, कोरोनाचे वाढते संकट पाहता त्याला पर्याय काही असेल का, हे पाहायला हवे.- माधव जिनकर, पालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे