शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यातील अवैध वाहतुकीवर ‘आरटीओ’ची धडक कारवाई

By admin | Updated: December 22, 2016 05:59 IST

अवैध वाहतूक रोखण्यासाठी ठाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाने बुधवारी धडक मोहीम राबवून

ठाणे : अवैध वाहतूक रोखण्यासाठी ठाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाने बुधवारी धडक मोहीम राबवून तब्बल ५५ वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी ४२ वाहने जप्त केली असून यामध्ये काही स्कूल बसेसचाही समावेश आहे.नियमांचे उल्लंघन करून बिनदिक्कतपणे रस्त्यावर धावणाऱ्या प्रवासी आणि मालवाहू वाहनांवर कारवाई करण्यासाठी ‘आरटीओ’ विशेष मोहीम राबवली. क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा माल भरलेली वाहने तसेच टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यावेळी कारवाई केल्याची माहिती ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. या मोहिमेंतर्गत एकूण ५५ वाहनांवर कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करून टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी लक्झरी बसेस तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी न घेणाऱ्या काही स्कूलबसेसही या वेळी जप्त केल्या. जप्त केलेली वाहने साकेत परिसरातील मैदानामध्ये ठेवली आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. (प्रतिनिधी)