शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचे कामबंद आंदोलन, पालिकेकडून कंत्राटदाराला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:39 IST

उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कामगारांनी पगार झाला नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

उल्हासनगर : शहरातील कचरा उचलणाऱ्या कामगारांनी पगार झाला नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेने कचऱ्याचे ढीग साचू नये, म्हणून खासगी जेसीबी व डम्परच्या मदतीने कचरा उचलत आहे. दरम्यान, कोनार्क कंपनीला नोटीस दिल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली.उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट कोनार्क कंपनीला दिले आहे. कचरा उचलण्यावर दिवसाला चार लाख ४६ हजार, महिन्याला १ कोटी ३४ लाख रुपये व वर्षाला १५ कोटीपेक्षा जास्त खर्च महापालिका करते. कोरोना काळात महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने कंत्राटदाराला गेल्या तीन महिन्यांपासून पैसे दिले नाही. हे कारण पुढे करून कचरा उचलणाऱ्या ५५०पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. कामगारांचा ४ डिसेंबर रोजी पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी वेतन नाही, तोपर्यंत कामबंद अशी भूमिका घेतल्याने शुक्रवारपासून कामबंद आंदोलन केले. कामगारांच्या आंदोलनाने शहरात कचऱ्याचे ढीग साचू नयेत, म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन जेसीबी मशीन, ८ डम्पर कचरा उचलण्यासाठी लावले आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत कंत्राटदाराला पैसे देण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिल्याने आंदोलन मागे घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.शहरात ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीगकामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे घरोघरी जाऊन कचरा उचलला गेला नाही, तसेच अनेक ठिकाणी कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या असून, सर्वत्र कचरा व अस्वच्छतेचे चित्र होते. नागरिकांनी पालिकेच्या कारभाराविराेधात संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर