शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करवसुली न झाल्यास होणार कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:58 IST

नवीन मालमत्तांसाठी सर्वेक्षणाचे आदेश; उत्पन्नवाढीसाठी निर्णय

ठाणे : मालमत्ता आणि पाणीपुरवठा कराची वसुली उद्दिष्टानुसार न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देतानाच, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले. नवीन मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारणी करून उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.मनपा क्षेत्रात मालमत्ता व पाणीपुरवठा करवसुली मोहीम सुरू असून, शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे विभाग प्रमुखांची बैठक घेऊन करवसुलीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे हे उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची, तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे. १०० टक्के वसुलीकरिता प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्टे देण्यात आली आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार मालमत्ता आणि पाणीपुरवठा कराची वसुली न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत डॉ.शर्मा यांनी दिले आहेत. प्रभाग समितीनिहाय देण्यात आलेले दैनंदिन उद्दिष्टे १०० टक्के पूर्ण करून, वसुलीचा दैनिक आढावा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.थकबाकीदारांचा पाणीपुरवठा करणार बंदमहापालिका क्षेत्रातील नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आले असून, नवीन मालमत्तांना कर आकारणी करून उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. जे थकबाकीदार पाणीपुरवठा कर भरणार नाहीत, त्यांची नळ संयोजने खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्यासोबतच जप्तीची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका