शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीनंतर मोखाड्यात तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:22 IST

मोखाडा - येथील मुस्लिम समाजातील दोन गटांमध्ये शुक्र वारी उसळलेल्या दंगली प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी, दंगल घडविल्याचा आरोप ठेवून मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मोखाडा - येथील मुस्लिम समाजातील दोन गटांमध्ये शुक्र वारी उसळलेल्या दंगली प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी, दंगल घडविल्याचा आरोप ठेवून मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पैकी ४२ जणांना ताब्यात घेतले असून त्यांना जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयाने १२ जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मोखाड्यातील खाटीक आणि मनियार, शेख या मुस्लिम समाजातील दोन गटांत पुर्व वैमनस्यातुन शुक्र वारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दंगल उसळली होती. या दंगलीत दगड , विटा, सोडावाटरच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला होता. तसेच नंग्या तलवारी ही सर्रास नाचविण्यात आल्या होत्या. या दंगलीत दोन्ही गटातील सात ते आठ जणं जखमी झाले आहेत. ही दंगल घडवून आणल्या प्रकरणी मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर दंगल घडविल्या चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यामधील ३६ जणांनासह ६ अल्पवयीन तरुणांना मोखाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना जव्हार येथील प्रथम वर्ग न्यायालयाने १२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर मोखाड्यात तणावपूर्ण शांतता आहे.मोखाड्यात प्रथमच आणि रमजान महिन्यात अशी घटना घडल्याने मुस्लिम मोहल्ल्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदोबस्त चोख असून या घटनेचा तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे करत आहेत.रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात- रमजान महिना असल्याने, मुस्लिम समाजाला शांततेत नमाज अदा करता यावी म्हणून प्रशासनाने सर्वांना आवाहन केले आहे.- मशीदी सह मुस्लिम मोहल्ल्यात शीघ्र कृती दल आणि दंगल विरोधी पथकाच्या तुकड्यांसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या