शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील हरवलेल्या संवादामुळे तणाव वाढतोय : अश्वीनी बनसोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 19:25 IST

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे अश्विनी बनसोडे यांनी मानसीक तणावांची कारणे व उपाय या विषयावर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देदोन पिढ्यांनी एकमेकांशी संवाद साधला तर बराचसा ताण कमी होईल - अश्वीनी बनसोडेमानसीक तणावांची कारणे व उपाय या विषयावर मार्गदर्शन तुमच्या आवडीचा छंद जोपासा - अश्वीनी बनसोडे

ठाणे : हल्ली प्रत्येक गोष्टीत ताण वाढत आहे. ताणतणावाची अनेक कारणे आहेत. कुटुंबातील हरवत चाललेला संवाद हे ही तणावाचे मुख्य कारण आहे. दोन पिढ्यांनी एकमेकांशी संवाद साधला तर बराचसा ताण कमी होईल असे मत समुपदेशक अश्विनी बनसोडे यांनी व्यक्त केले.अत्रे कट्ट्यावर बुधवारी मानसीक तणावांची कारणे व उपाय या विषयावर बनसोडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्या म्हणाल्या की, कोणतीही वेळ नाही जिथे तणाव नाही, तणावाला सगळेच जण सामोरे जात असतात. तणाव हा मानसीक नसतो तर शारिरीकही असतो. या तणावात सकारात्मक आणि नकारात्मक ताण असतात. ताण घेताना त्यात दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. तणाव कमी करण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते. वेळेचे नियोजन न केल्यास तणाव वाढत जातो हे सांगताना त्यांनी उदाहरणे दिली. तरुणांमध्ये वाढत चाललेल्या तणावाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या वाढत चाललेल्या गरजा आणि इच्छा तर कुटुंबातील दबावामुळे ज्येष्ठ नागरिकांत तणाव वाढत आहे. कुटुंबातील संवाद हरविल्यामुळे ज्येष्ठांमध्ये दुर्लक्ष होण्याचा विचार येतो. ज्येष्ठांना या वयात येणाऱ्या रिकामपणामुळे त्यांच्यातील तणाव वाढत आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे दबाव यत आहे. तो दबाव बाहेर काढायला कोणी येत नाही याचे कारण कुटुंबात संवाद नाही. दबाव हा एकमेकांशी बोलून कमी होतो. पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत हा ही पालकांवरचा ताण आहे. त्यामुळे पालकत्व सेमीनार घेण्याची गरज आहे. कौशल्याने तणावाचे व्यवस्थापन केल्यास तो कमी होतो हे सांगताना त्यांनी तणावाची लक्षणे स्पष्ट केली. शेवटी त्यांनी तणाव कमी करण्याचे उपायही सांगितले. त्या म्हणाल्या की, तुमच्या आवडीचा छंद जोपासा, आहे ती परिस्थीती स्वीकारा, नाही म्हणायला शिका, मनाला आनंद देणारे संगीत ऐका, कामाचे व वेळेचे नियोजन करा, मित्र मैत्रिणीबरोबर विनोदी चित्रपट पाहा, मेंदूला शांतता देणारे सुगंधी अत्तर वापरा. यावेळी ज्येष्ठांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुरूवातीला राधा कर्णिक यांनी परिचय करुन दिला.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई