शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या वाहतुकीच्या अफवेमुळे तणाव, बदलापूरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:38 IST

बंदी असलेल्या जनावरांची बेकायदा वाहतूक करून कत्तलीसाठी बदलापूरमध्ये आणली जात असल्याच्या संशयातून प्राणीमित्रांनी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी पाहणी केली.

बदलापूर - बंदी असलेल्या जनावरांची बेकायदा वाहतूक करून कत्तलीसाठी बदलापूरमध्ये आणली जात असल्याच्या संशयातून प्राणीमित्रांनी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांसोबत त्यांचा वाद झाला. या वादामुळे बदलापूर गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बदलापूर गावातील कबरस्तानाजवळील आसपासच्या जागेत काही जनावरे कत्तलीसाठी आणली असल्याची माहिती मिळाल्याने सोमवारी रात्री उशिरा एका प्राणीमित्र संघटनेचे सदस्य त्याची माहिती घेण्यासाठी पोलिसांसह आला होता. त्या ठिकाणी कोणतेही जनावरे न मिळाल्याने पोलिसांनी आसपासच्या भागात पाहणी करण्यास सुरूवात केली. यावेळी काही व्यक्ती या परिसरात जमाव करुन एकत्रित आले. त्यांनी पोलीस आणि त्या प्राणीमित्रासोबत वाद घातला. तसेच त्या प्राणीमित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी धाव घेत जमावाला मारहाणीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव थांबत नसल्याने प्राणीमित्राने स्वसंरक्षणासाठी स्वत:जवळची परवानाधारक बंदूक काढून हवेत एक गोळी चालवली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्याचवेळी पोलिसांनीही जमावाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमावाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकारानंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अफवेनंतर बदलापूर गावात मंगळवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.प्राणीमित्राच्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पाहणी केल्यानंतर तेथे काहीही हाती लागले नाही. त्यावेळी स्थानिक जमावाने प्राणीमित्राला मारहाण केली. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शांतता समितीची बैठक घेत बदलापूर गावात शांतता प्रस्थापित करण्यात यश आले आहे.- प्रमोदकुमार शेवाळे,पोलिस उपायुक्त,परिमंडळ चार.

टॅग्स :thaneठाणे