शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बदलापूरला फेरीवाले, दुकानदारांमध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 23:29 IST

नव्या विक्रेत्यांची भर : वाहतुकीला अडथळा

बदलापूर : लॉकडाऊनकाळात नागरिकांना सुविधा व्हावी, या उद्देशाने बदलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतरही बाजारपेठ परिसरातील फेरीवाले जागा सोडायला तयार नाहीत. त्यावरून आता व्यापारी व फेरीवाले असा संघर्ष होऊ लागल्याचे चित्र बदलापूरमध्ये दिसू लागले आहे.

बदलापूरच्या पश्चिम भागात मुख्य बाजारपेठ असून येथे भाजीमंडईही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय फळ व भाजीविक्रेत्यांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून शहरातील मोकळे रस्ते आणि चौकात बसण्याची मुभा दिली होती. लॉकडाऊनकाळात अनेक नव्या भाजी, फळविक्रेत्यांची यात भर पडली. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्रास होत असून स्वत:च्या दुकानात व्यवसाय करणे कठीण झाले आहे, अशी भावना व्यापारी व्यक्त करतात.  गेल्या आठवड्यात एका फेरीवाल्याला हटकले असता त्याने थेट दुकानदारावर धावत जाऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यामुळे अशा हेकेखोर आणि मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील आदिवासी, शेतकरी यापूर्वीही व्यवसाय करत होते. मात्र त्यांनी दुकानदारांना कधी त्रास दिला नव्हता. आता मात्र फेरीवाले शिरजोर होऊ लागले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आम्ही कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासकांना केली असल्याचे बाजारपेठ व्यापारी जनसेवा मित्र मंडळाचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी सांगितले.आता अनलॉक सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे स्थानक, बाजारपेठ परिसरात गजबज वाढली आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर बसलेले फेरीवालेही तिथेच आहेत. काही फेरीवाल्यांच्या पूर्वी एक ते दोन असलेल्या टोपल्या आता सात ते आठच्यावर गेल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूर