शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या वर्तकनगर दोस्ती विहार संकुलात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:22 IST

वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलामध्ये आठ जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण आहे. ठाणे महापालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

ठळक मुद्देएकाच आठवडयात आठ जणांवर केला हल्लालहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे गेली सात महिने सुरु असलेल्या टाळेबंदीमध्ये आता शिथिलता आली आहे. मात्र, सार्वजनिक उद्यानात खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांच्या अंगावर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला होण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. विशेषत: वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलामध्ये आठ जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण आहे.फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी उद्यानात जाणाºया मुलांच्या अंगावर भुंकणे, जेष्ठ नागरिकांच्या मागे लागणे त्याचबरोबर मोटारसायकलस्वाराचा पाठलाग करणे आदी प्रकार ठाण्यातील वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याबाबत ठाणे महापालिकेकडे तक्र ार करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.ठाणे शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांनी मोठया प्रमाणात उच्छाद घातला आहे. अनेक भागात असलेले कचºयाचे साम्राज्य, चायनीजच्या गाडयांवरील उरलेले अन्न पदार्थ या भटक्या कुत्र्यांना दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक तसेच विविध संकुलातील खासगी उद्यानांमध्येही या भटक्या कुत्र्यांचा वावर मोठया प्रमाणात वाढला होता. इतरत्र त्यांना त्यांचे खाद्यही न मिळाल्याने रस्त्यावरुन जाणाºया नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांच्यावर भुंकणे तसेच त्यांचा चावा घेणे असे प्रकार या भटक्या कुत्र्यांकडून सुरु आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणासाठी त्यांचे ठाणे महापालिकेकडून निर्बीजीकरणही केले जाते. तरीही ठाण्यातील वर्तकनगर भागातील दोस्ती विहार या संकुलात गेल्या दोन वर्षांतच या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्याचे येथील रहिवाशी गिरीश म्हात्रे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात ७० ते ८० रहिवाशांना या कुत्र्यांनी लक्ष केल्याचीही माहिती म्हात्रे यांनी दिली. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी ठाणे महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, पालिका प्रशासनाने कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीdogकुत्रा