शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

वंचित मुलांचा शैक्षणिक अनुशेष भरण्यासाठी धोरणात्मक संरक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:11 IST

राष्ट्रीय शिक्षण धोरण परिसंवाद : मान्यवरांनी केली एकमुखी मागणी

ठाणे : ज्याप्रमाणे सामाजिक व आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद घटनेत आहे त्याच पद्धतीने देशात असलेल्या वंचित मुलांचा शैक्षणिक अनुशेष भरण्यासाठी आरक्षणाच्या धर्तीवर वेगळे धोरणात्मक संरक्षण मिळायला हवे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर स्वतंत्र विभाग असावा, अशी एकमुखी मागणी राष्ट्रीय शिक्षण धोरण परिसंवादात करण्यात आली. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात मंगळवारी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद व्हाव्यात, अप्रगत व शाळाबाह्य मुलांची अस्पष्ट व्याख्या, शिक्षण संकुलाची अवाजवी संकल्पना, अन्यायकारक बेस्ट टिचर संकल्पना, स्कूल ट्रान्सर्पोटेशनचा मर्यादीत परीघ, अंगणवाड्या शाळांशी जोडणे असे अनेक मुद्दे नव्या शैक्षणिक धोरण्याच्या मसुद्यात वंचित मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अन्यायकारक असून या मुद्यांना न्याय देण्यासाठी शाळाबाह्य वंचित मुलांच्या शैक्षणिक समस्यांसाठी केंद्र व राज्यपातळीवर स्वतंत्र विभाग असावा, अशी एक मोठी मागणी वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रभरातील काम करणाºया कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण आक्षेप व सूचना या विषयावर आयोजित परिसंवादात केली. वंचित मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न हे असमतोल आर्थिक विकास, जगण्याची समान संधी नसणे, पायाभूत सुविधांचा अभाव, सामाजिक व आर्थिक कारणांनी करावे लागणारे स्थलांतरण अशा अनेक प्रश्नांशी निगडीत आहेत. ते सोडवण्यासाठी दीर्घकाळ जावा लागणार आहे. या दरम्यानच्या काळासाठी मुलांच्या शिक्षणातल्या प्रश्नांच्या विषयाला वेगळ््या पद्धतीनेच हाताळावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीच्या तरतुदीदेखील तशाच वेगळ््या असायला हव्यात. मसुद्यातील स्मॉल स्कूल संकल्पना बंद करण्याची तरतूद वंचित मुलांसाठी धोक्याची ठरणार आहे, स्कूल ट्रान्सर्पोटेशनमध्ये घर ते शाळा व शाळा ते घर असा उल्लेख नसण्याने दुर्गम भागातील मुलांना शाळेपर्यंत पोहचण्याचा घटनात्मक अधिकार त्यामुळे नाकारला जाणार आहे. अप्रगत व शाळाबाह्य मुलांची व्याख्या अस्पष्ट असल्याने शाळेत दाखल झालेली परंतु शाळेत न गेलेली मुलेदेखील शाळाबाह्य ठरत नाहीत तसेच अप्रगत मुलांचीदेखील व्याख्या स्पष्ट नसल्याने करोडो मुले योजना, सवलती व धोरणात्मक संरचनेच्या परिघापासून वंचित राहतात. विशिष्ट अंतरातील काही शाळांचे सामूहिक सुविधा उपलब्धतेसाठी शिक्षण संकुलाची अवाजवी संकल्पना धोरणात येऊ पाहत आहेत, यामुळे शाळेतील सर्व मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा शाळा आवारातच मिळण्यास अडचणी येणार आहेत.

अप्रगत मुलांसाठी अन्यायकारक बेस्ट टिचर संकल्पना विचाराधिन असली तरी हा न्याय सर्वच मुलांना लागू व्हायला हवा अशी सूचना सहभागी तज्ज्ञांनी मांडली. स्कूल ट्रान्सर्पोटेशनचा मर्यादीत परीघ, अंगणवाड्या शाळांशी जोडणे असे अनेक मुद्दे नव्या शैक्षणकि धोरण्याच्या मसुद्यात वंचित मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अन्यायकारक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या मान्यवरांनी घेतला सहभाग ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे, शांतीवन बीडचे दीपक नागरगोजे, उमेद, वर्ध्याच्या मंगेशी मून, प्रगती प्रतिष्ठान, जव्हारच्या सुनंदाताई पटवर्धन, दिव्य विद्यालय, जव्हारच्या प्रमिलाताई कोकड, घरकूल, कल्याणच्या नंदिनी बर्वे, मंदार शिंदे, पुणे, जिद्दच्या माजी मुख्याध्यापिका श्यामश्री भोसले, सरस्वती विद्यामंदीर शाळेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे ट्रस्टी कमलेश प्रधान, सिग्नल शाळेच्या आरती पवार परब, आदी चर्चासत्रात सहभागी होते.विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते व शैक्षणिक संस्थांनी नव्या शैक्षणिक धोरण्याच्या मसुद्याचा अभ्यास करून आपापल्या सूचना व हरकती ३१ जुलै पर्यंत पाठण्यिाचे आवाहन समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांनी यावेळी केले.