शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिकेचा अजब कारभार; इमारत कोरोना विलगीकरणासाठी केली आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 06:54 IST

गृहकर्जाचे हप्ते, राहत्या घराचे भाडे असा दुहेरी भुर्दंड आवाक्याबाहेर गेल्याची प्रतिक्रिया शीळफाटा येथील भारत इकोव्हीस्टा इमारतीत घर घेतलेल्या राधिका देसले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन वर्षे विलंबाने घराचा ताबा मिळणार होता. मात्र, इमारतीचा वापर परवाना (ओसी) मंजूर करण्याऐवजी कोरोना विलगीकरणासाठी ती ठाणे पालिकेने आरक्षित केली. लोकांच्या विरोधामुळे हे सेंटर सुरू झाले नाही. मात्र, पालिका इमारतीचे उर्वरित कामही करू देत नाही; आणि ओसीही देत नाही. त्यामुळे हक्काच्या घराचा ताबा मिळविण्यात विघ्न निर्माण झाल्याचे घर मालकांचे म्हणणे आहे.

गृहकर्जाचे हप्ते, राहत्या घराचे भाडे असा दुहेरी भुर्दंड आवाक्याबाहेर गेल्याची प्रतिक्रिया शीळफाटा येथील भारत इकोव्हीस्टा इमारतीत घर घेतलेल्या राधिका देसले यांनी दिली. तीनपैकी दोन इमारतींचे काम पूर्ण झाले. तेथील घरांचा ताबा मालकांना दिला. तिसरी इमारत २०१७ साली पूर्ण होणार होती. फेब्रुवारी, २०२० मध्ये विकासकाने इमारतीच्या ओसीसाठी पालिकेत अर्ज केला. कोरोनाचे कारण देत ती मंजूर झाली नाही. दरम्यान, २९ मे रोजी ठाणे पालिकेने नोटीस धाडून इमारत आयसोलेशन सेंटरसाठी आरक्षित करीत असल्याचे सांगितले. सेंटरमुळे अन्य इमारतीतल्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती होती. त्यामुळे स्थानिकांनी विरोध केला.दोन महिने होऊनही येथे रुग्ण आयसोलेशनसाठी आले नाहीत. पाठपुराव्यानंतरही ओसी मिळत नसल्याने सुमारे १०० कुटुंबांना हक्काच्या घराचा ताबा मिळेनासा झाला आहे. पालिका अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता नोटीस रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नसल्याचे उत्तर देण्यात आले.सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोपविलगीकरण केंद्राची नोटीस रद्द करावी, या मागणीसाठी रहिवाशांनी पालिकेचे साहाय्यक आयुक्त, उपायुक्त, आयुक्त, मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या. मात्र, कुठूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस