शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल मिडियावर जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करणाऱ्यांना वेळीच अटकाव करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 16:06 IST

एकीकडे अभियंत्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी अभियंत्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच राज्यभर गाजत आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करणाऱ्यांना वेळीच अटकाव करा, अशी मागणी ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना साकडेआव्हाड यांच्यावर अत्यंत अश्लील भाषेत टीकायामुळेच कार्यकर्त्यांकडून उद्रेक होत असल्याचा केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोशल मिडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत अश्लील भाषेत टीका करण्यात येत आहे. त्यांची हत्या करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांकडून उद्रेक होत आहे. अशा समाजकंटकांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.परांजपे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनंत करमुसे याने अत्यंत गलिच्छ शब्दांमध्ये गेली चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कार्यकर्ते यांच्याविरुद्ध लिखाण केले आहे. आव्हाड यांच्याविरु द्ध अत्यंत अर्वाच्च भाषेत मेसेजही टाकले आहेत. त्यांच्या पत्नी तसेच मुलीवर बलात्कार करु इथपासून ते तुमचा दाभोळकर करु , असे खुलेआम ट्विटर आणि फेसबुकवर धमक्याही दिल्या आहेत. एकीकडे वैचारीक युद्ध चालू असताना निष्कारण अश्लील भाषेचा वापर करु न वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होतो. दुसरीकडे खून, बलात्कारासारख्या धमक्या दिल्या जातात. मग यांच्याविरु द्ध कार्यकर्त्यांकडून उद्रेक झाला तर निष्कारण त्या कार्यकर्त्यांना दोष दिला जातो. त्यामुळे वेळीच अशा प्रवृत्तींना अटकाव करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. या निवेदनासोबत आव्हाड यांना दिलेल्या धमक्या, त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबीयांसंदर्भात केलेल्या अश्लील टीप्पण्यांचे पुरावे देखिल सादर केले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसPoliticsराजकारण