शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

शेती विकून हळद समारंभ करणे थांबवा

By admin | Updated: June 2, 2017 05:23 IST

शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. आता हळद, साखरपुडा आणि लग्नसमारंभ पाहून वीट येतो, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या. शेती पिकत नाही, शेतमाल विकला जात नाही, ही नकारात्मकता मनातून काढून टाका. बदलापूरची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. या लोकसंख्येला अपुरा भाजीपाला उपलब्ध होत आहे. बदलापूर आणि आसपासच्या परिसरात जितकी शेती पिकवू, तितकी कमीच आहे. आपण शेती करा, आपल्याला काय कमी पडते, ते सांगा. शासनाच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही कथोरे यांनी दिले. ‘शिवार संवाद’कार्यक्र माच्या माध्यमातून कथोरे यांनी शेतकऱ्यांकरिता असलेले शासनाचे उपक्रम, योजना यांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. बेडशीळ येथील सदानंद सुरोशे यांच्या ‘उत्कर्ष कृषी पर्यटन केंद्रा’च्या शेतावर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आपल्या विभागात शेतकरी शेतीसाठी कर्जच काढत नाहीत, तर कर्ज माफ कोणाचे करायचे? भाताबरोबरच अन्य भाजीपाला कसा पिकवता येतो, हे कृषीभूषण राजेंद्र भट यांच्यासारख्या आपल्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या अनुभवाचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. आपल्या भागातील भाजीपाला उत्पादकांसाठी शहरात खाजगीकरणातून भाजीविक्र ी केंद्र सुरू करत आहोत. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास आशीष गोळे यांनी व्यक्त केला.तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांची यावेळी भाषणे झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, राजेश शर्मा, ऋतुराज जोशी, सदानंद सुरोशे, महेश सुरोशे, संजय आदक आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच चित्रा पारधी यांनी स्वागत केले, तर कृषी पर्यवेक्षक सचिन केणे यांनी आभार प्रदर्शन केले. शेतकरी उत्पादक व्हावाआपल्या तालुक्यातील ५० टक्के शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. शासनाने फुलशेती व अन्य उत्पादनाबाबत प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. प्रशिक्षणासाठी जी फी भरावी लागते, ती तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती भरेल. बदलापूरमधील शेतकरी हाच आता ग्राहक झालेला आहे. यात परिवर्तन घडवून शेतकरी हा जास्त उत्पादक होणे आवश्यक आहे.