शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तीन घरे फोडून साडे सात लाखांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:52 IST

ठाणे: शहरातील कापूरबावडी आणि मुंब्रा या परिसरांत फोडण्यात आलेल्या तीन घरांतून चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लांबवला आहे. या तिन्ही घटना शुक्रवारी घडल्या असून त्या घटनांमध्ये सुमारे ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.बाळकुम, शिवाजीनगर येथे राहणारे किरण कुंभार (३९) यांच्या घरातील किचनच्या दरवाजाची आतील कडी उघडून चोरट्यांनी ...

ठळक मुद्दे सुमारे ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला कापूरबावडी आणि मुंब्रा या परिसरातील घटना

ठाणे: शहरातील कापूरबावडी आणि मुंब्रा या परिसरांत फोडण्यात आलेल्या तीन घरांतून चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लांबवला आहे. या तिन्ही घटना शुक्रवारी घडल्या असून त्या घटनांमध्ये सुमारे ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.बाळकुम, शिवाजीनगर येथे राहणारे किरण कुंभार (३९) यांच्या घरातील किचनच्या दरवाजाची आतील कडी उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच कपाटातील आणि कुं भार यांच्या पॅण्टच्या खिशातील पाकिटातून असे चार लाख दोन हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. यामध्ये तीन लाखांचे दागिने आणि ५५ हजारांची रोकड असल्याचे तक्रारीत नमूद असून हा प्रकार १५ फेब्रुवारी रात्री १० ते १६ फेब्रुवारी ४.१० वा.च्या सुमारास घडल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.दुस-या घटनेत, बाळकुम पाडा-१ येथे राहणारे कमलेश ताहिलरमानी (४२) हे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ वा.च्या दरम्यान बाहेर गेले होते. याचदरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील ७१ हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एन.बी. गिरासे तपास करत आहेत.तसेच तिस-या घटनेत मुंब्रा, कौसागावमधील सागर पाटील (२८) हे १६ फेब्रुवारीला काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, त्यांच्या घराचे कुलूप उचक टून चोरट्यांनी घरातील सोनेचांदीच्या दागिन्यांसह ५५ हजारांची रोकड असा दोन लाख ५८ हजारांचा ऐवज लांबवला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.पी. करडे करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेRobberyदरोडा