शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला ठाण्याकडून ३९ लाख उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:54 IST

पंढरपूरसाठी सोडलेल्या लालपरीमधून (एसटी) ३९ हजार १६६ प्रवाशांनी सुखकारक प्रवास केला आहे.

- पंकज रोडेकरठाणे : आषाढी एकादशी म्हटली की, वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. त्यानिमित्ताने पंढरपूरला लाखोंच्या संख्येने वारकरी माऊलीच्या दर्शनाला जातात. पंढरपूरसाठी सोडलेल्या लालपरीमधून (एसटी) ३९ हजार १६६ प्रवाशांनी सुखकारक प्रवास केला आहे. त्यामुळे एसटीच्या ठाणे विभागाला जवळपास ३९ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.२३ जुलैच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया भाविकांकरिता ठाणे परिवहन विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून १९ ते २९ जुलै या दिवसात एकूण ७६ बसेस जादा सोडण्याचे नियोजन केले होते. १९ जुलैपासून त्या सोडण्यात आल्या. २४ जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक, पंढरपूर येथून परतीच्या वाहतुकीसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांना प्रवास सुखकर व्हावा, म्हणून एकूण जादा बसपैकी १० टक्के बसेस आगाऊ उपलब्ध करून दिल्या होत्या.पुणेकरांसाठी पंढरपूरला जाण्यासाठी ठाणे परिवहन विभागामार्फत जवळपास ४० बसेस पाठवल्या होत्या. अशा प्रकारे पंढरपूरसाठी एकूण ११० बसेस नियोजित होत्या.भारमान वाढलेया दिवसात भारमान ७१.४४ टक्क्यांनी वाढले होते. त्यातच, लालपरीच्या एकूण फेºयांमधून ३९ हजार १६६ प्रवासी सहभागी झाले होते. त्यातूनच ठाणे एसटी विभागाला ३९ लाखांचे उत्पन्न यंदा मिळाल्याची माहिती ठाणे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे