शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महसूल क्लर्क कर्मचार्‍यांना गणराय पावले; 'लिपीक' पदाचे 'नवे' नामकरण झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 14:18 IST

गुरुवारी राज्य शासनाचे सह सचिव डाँ. संतोष भोगले,  यांनी डिजीटल स्वाक्षरीद्वारे महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम 'महसूल सहायक' केल्याचा आदेश जारी केला आहे.

सुरेश लोखंडे 

ठाणे : प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्यांपैकी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम 'महसूल सहायक' केल्याचे राज्य शासनाने 20 आँगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात नमुद केले,असे येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा शाखेचे जेष्ठ पदाधिकारी प्रशांत कपडे, भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.       गुरुवारी राज्य शासनाचे सह सचिव डाँ. संतोष भोगले,  यांनी डिजीटल स्वाक्षरीद्वारे महसूल शाखेच्या लिपिकाचे पदनाम 'महसूल सहायक' केल्याचा आदेश जारी केला आहे. संघटनेच्या काही मागण्यां पैकी ही एक मागणी मान्य करून शासन निर्णयही जारी झाला आहे.वास्तविक ही मागणी राज्य संघटनेच्यावतीने 1987 पासून वारंवार करण्यात येत होती. यासाठी 1995 साली तत्ककालीन सुनिल जोशी, रविंद्र देशमुख, आर.जे.पाटील आदी जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसांचा संपही झाला होता, असेही कापडे, यांनी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत साळवी, यांच्या मार्गदर्शनाची साक्षी देत स्पष्ट केले.          आपल्या प्रलंबित व न्याय मागण्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जुलै 2019 पासून  एक कालबद्ध आंदोलनाचा कार्यक्रम राज्य संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 4 सप्टेंबर 2019 रोजी अपर मुख्य सचिव, महसूल यांचे अध्यक्षतेखाली इतर वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीत संघटने बरोबर 19 प्रलंबित मागण्यांपैकी प्रमुख 13 मागण्यावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली  होती. या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही महसूल लिपीकाचे पदनाम "महसूल सहायक" करणे ही होती. ती 20 ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारी शासन निर्णया द्वारे मंजूर करण्यात आली आहे.            तत्कालीन महसूल मंत्री सुधीरभाऊ जोशी यांचे दालनात या मागणीवर सविस्तर चर्चा होऊन तत्वतः मान्य होऊन देखील  प्रत्यक्षात शासन निर्णय निघू शकला नाही. त्यानंतरच्या काळात राज्य संघटनेच्या वतीने वेळोवेळी आपल्या न्याय प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली या सर्व आंदोलनातील एक प्रमुख मागणी ही लिपीकाचे पदनामात बदल करण्याची होती. या न्याय मागणीकडे राज्य  शासनातील अनेक विभागांनी आक्षेप घेत ही पदनाम बदलाची मागणी अनेक वर्ष प्रलंबित होती. गेल्या तीस वर्षात राज्य महसूल संघटनेच्या अनेक नेत्यांनी केलेले प्रयत्न गेल्या वर्षी 4 जुलै रोजी राज्य शासना बरोबर चर्चा झाली. त्यास अनुसरुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदनाम बदलाची मागणी मान्य असल्याचे लेखी पत्र राज्य महसूल संघटनेस दिले होते. पण मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यावर मागील सरकारच्या कालावधीत मंजूर झालेल्या मागणीसाठी या विद्यमान सरकारकडे पाठपुरावा करून महसूल शाखेच्या  'लिपीक' पदाचे आता 'महसूल सहायक', असे नामकरण करण्यात आले आहे.           'लिपीक' पदाचे आता 'महसूल सहायक', असे नामकरण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी व अधिकारी यांनी आनंद व्यक्त करून समाधान व्यक्त केले. त्याबद्दल राज्य महसूल संघटनेचे मागील सर्व पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी,  विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व कर्मचारी यांनी राज्य महसूल संघटनेवर विश्वास दर्शवून पाठिंबा देऊन सर्वांची साथ आणि सहयोग व मार्गदर्शन मिळाल्याने आम्ही राज्य महसूल संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, अपर मुख्य सचिव, महसूल व वित्त सचिव, सचिव सा.प्रशासन आदींचे राज्य महसूल संघटनेच्या वतीने  आभार व्यक्त करीत आहोत, असे कापडे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात