शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘घरातच बसा’चे ठाण्यात तुणतुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:13 IST

प्रशासनाचे रडगाणे : चारपेक्षा जास्त लोक जमण्यास बंदी, जिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यात येत्या ५ आणि ८ जूनपासून कंटेनमेंट झोन वगळता अनेक ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा सरकारने केली असताना ठाणे जिल्ह्यात चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी करणारे मनाई आदेश लागू केले आहेत. अमेरिका तसेच युरोपमधील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण ठाणे जिल्ह्यापेक्षा जास्त असतानाही तेथील दैनंदिन जीवन सुरळीत करण्यात आले असताना ठाणे जिल्ह्यातील प्रशासन निर्बंध अधिक घट्ट करण्यात धन्यता मानत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई-पासशिवाय परवानगी नाही, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आंतरजिल्हा प्रवाशांकरिताही ई-पासची सक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासनाने येत्या ८ जूनपासून अनेक व्यवहारांमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केली आहे. तसेच आजपासून आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण दिवसभराची संचारबंदीही शिथिल करून रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील काही दाट वस्तीच्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असल्याचे कारण पुढे करून सरसकट ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण भागात संचारबंदी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील ज्या शहरांमधील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, तेथील व्यवहार पूर्ववत सुरू करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ अत्यावश्यक कामांसाठी म्हणजे किराणा, दूध वितरण, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संचारबंदी लागू राहणार नाही. याशिवाय, अत्यावश्यक कामांकरिता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी राहणार आहे. मुख्य बाजारपेठ येत्या ५ जूननंतर सुरू होणार असून ती समविषम तारखेनुसार एक दिवसाआड रस्त्याच्या एकाच बाजूने सुरू राहणार आहे. १ ते ३० जून या कालावधीत हा मनाई आदेश लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, स्पर्धा, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार असल्यामुळे आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत प्रवासी बसवाहतुकीस मनाई आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद राहतील. ३ जूनपासून सार्वजनिक उद्यानात व्यायाम, फिरणे, सायकलिंगला सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा राहणार आहे.केवळ अत्यावश्यक कामांसाठी १ ते ३० जून या काळात घराबाहेर पडण्यासाठी परवानगी राहणार आहे. ५ जूननंतर समविषम तारखेनुसार दुकाने बाजारपेठांमध्ये सुरू करता येतील. आंतरराज्य आणि जिल्हा प्रवासाला मात्र अजूनही पोलीस ई-पासशिवाय परवानगी दिलेली नाही.’’- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयअत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सीचालक अधिक दोन, रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहनांतूनही चालकासह तिघे, दुचाकीवर फक्त चालक यांना परवानगी दिल्याचे आदेशात म्हटले आहे.