शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा दौरा; विवेक पंडितांनी घेतली आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 07:34 IST

राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचा शासकीय दौरा सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे, नुकताच पालघर,अमरावती आणि नाशिक जिल्ह्याचे दौरे नुकतेच पार पडले, यातही पंडित यांनी अनेक ठिकाणी भेटी देत, पाहणी केली

शहापूर - राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष  विवेक पंडित (राज्यमंत्री) यांचा ठाणे जिल्हा दौरा सुरू झाला आहे. शहापूर तालुक्यातुन सुरू झालेल्या या झंझावाती दौऱ्यात पंडित यांनी सर्वप्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट देत आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली. यानंतर शासकीय तंत्र निकेतन, तालुक्यातील बालविकास प्रकल्प ,अंगणवाडी यांना भेटी देत दौरा सुरू राहिला. 

राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांचा शासकीय दौरा सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे, नुकताच पालघर,अमरावती आणि नाशिक जिल्ह्याचे दौरे नुकतेच पार पडले, यातही पंडित यांनी अनेक ठिकाणी भेटी देत, पाहणी केली. ठाणे जिल्हा दौऱ्यात अधिकारी आणि प्रशासनाच्या अडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न पंडित यांनी केला. 

यावेळी काही नागरिकांनी,सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी समस्या तक्रारींची निवेदने यावेळी राज्यमंत्री विवेक पंडित यांना दिली. यावेळी आलेल्या तक्रारीबाबत पंडित यांनी तातडीने अधिकाऱ्यांना विचारणा केली. यावेळी काही शिक्षक ,कर्मचारी राजकीय दबाव आणून आपल्या सोयीप्रमाणे प्रतिनियुक्त्या करून घेतात. काम एकीकडे आणि वेतन दुसरीकडे अशी अवस्था असते. याबाबत नागरिकांमध्ये,पालकांमध्ये संताप होता. पंडित यांनी येथील प्रकल्प अधिकारी ए.के.जाधव यांना याबाबत सूचना देत सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्याबाबत आदेश केले. याबाबत कोणत्याही राजकीय दबावाचा विचार करण्याची आवश्यकता नाही असे यावेळी पंडित यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयात पंडित यांनी तब्बल दोन तास वेळ दिला. पूर्ण रुग्णालयाची पाहणी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत पंडित यांनी तपशीलवार आढावा घेतला. येथील धोरणात्मक त्रुटी आणि रुग्णालयातील प्रशासकीय त्रुटी याबाबत तपशीलवार नोंदी घेत आढावा घेण्यात आला, येथील कंत्राटी सफाई कामगारांच्या वेतन आणि इतर सुविधांबाबत माहिती घेत त्यांना तातडीने थकीत वेतन अदा करण्याचे आदेश देत पंडित यांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले.

वीरबाला हाली बरफच्या नवीन घराला विवेक पंडितांची भेटहाली बरफ या वाघाशी झुंज दिलेल्या आदिवासी विरबालेच्या घरी अध्यक्ष विवेक पंडित यांनी दौऱ्या दरम्यान भेट दिली. हाली बरफच्या धाडसाचे कौतुक करत 2013 साली सरकारने सन्मान करत तिला वीरबाला पुरस्कार मिळाला. मात्र त्यानंतर हाली आणि तिचे कुटुंब पूर्णपणे दुर्लक्षित झाले. पाठ्यक्रमात हालीच्या जीवनावर “वीरबाला हाली”हा धडा आल्यानंतर माध्यमांनी हालीबाबत बातमी केली आणि नंतर विवेक पंडित यांच्या सुचनेने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करत हलीला घर आणि रोजगार मिळवून दिले.