शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ८,२८८ अंगणवाड्यांत ना शौचालये ना पिण्याचे पाणी; कसे मिटेल कुपोषण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 06:31 IST

निधी देण्यास शासनाचा आखडता हात

नारायण जाधव 

ठाणे : राज्य शासन कोट्यवधी रुपये खर्चाचे नवनवे प्रकल्प रोज घोषित करीत असले, तरी बालके, स्तनदा मातांसह गरोदर महिलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील तब्बल २,८२३ अंगणवाड्यात शौचालय तर ५,४६५ अंगणवाड्यांत साधे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाड्याच्या खोलीत, कुडाच्या झोपडीत अंगणावाड्या भरतात. काही ठिकाणी मालकीच्या अंगणवाड्या असल्या तरी त्यातील २,८२३ अंगणवाड्यांत शौचालय तर ५,४६५ अंगणवाड्यांत साधे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. केंद्र शासनाने ज्या अंणवाड्यांची वास्तू मालकीची आहे, त्यांना शौचालयासाठी १२ हजार तर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी १० हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता दिली. यात केंद्राचा हिस्सा ६० टक्के आणि राज्याचा हिस्सा ४० टक्के देण्याचे ठरले. केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात पाच कोटी ६२ लाख ८६ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले; परंतु दोन कोटी ६२ लाख ३२ हजार रुपये महाराष्ट्र शासनाने दिले नाहीत. यामुळे केंद्राकडून आलेला निधी अखर्चिकच राहिला. आता कुठे फेबु्रवारी महिन्यातच केंद्र आणि आपल्या हिश्शाचे मिळून नऊ कोटी ३८ लाख १० हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.आता अंगणवाड्यांत शौचालय आणि पिण्याचे पाणी देण्यासाठी निधी वितरित केला असला, तरी तो जिल्हा आणि तालुका, गावपातळीवर वेळेत पोहोचेलच असे नाही. शिवभोजनाचा गाजावाजा होत असला तरी अंगणवाड्यांत पोषणआहाराचे पैसेही सहा-सहा महिने मिळत नाहीत. -विवेक पंडित, अध्यक्ष, आदिवासी क्षेत्र विकास योजना आढावा समिती, महाराष्ट्र

टॅग्स :thaneठाणेTrible Development Schemeआदिवासी विकास योजना