शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अद्यावत ग्रंथालयाच्या उभारणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 15:34 IST

प्रगती महाविद्यालयात अद्यावत ग्रंथालयाच्या उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेला ग्रंथपालांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

डोंबिवली - प्रगती महाविद्यालयात अद्यावत ग्रंथालयाच्या उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेला ग्रंथपालांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) बदललेल्या निकषानुसार ग्रंथालये उभारणं आणि ग्रंथपालाच्या पदोन्नतीसाठी शैक्षणिक गुणवत्ता निर्धारणासाठी तयारी करणं या विषयांवर प्रगती महाविद्यालयांमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या विविध भागातून 80 ग्रंथपाल सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री व ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथपालांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी मसुदा तयार करण्याचे कार्य करणा-या समितीचे अध्यक्ष डॉ. देवाजित सरकार, प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. पां. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रगती महाविद्यालयातर्फे प्रथमच अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

जगन्नाथ पाटील म्हणाले, वाचाल तर वाचाल या युक्तीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यानं महिन्याला किमान एक पुस्तक तरी वाचले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ग्रंथालयातून आखाले गेले पाहिजेत. ग्रंथालये अद्यावत असणे ही त्यासाठी गरजेचे आहे. ग्रंथालयातील विविध उपक्रम विद्याथ्र्यांर्पयत पोहोचविण्याचे काम ग्रंथपालांनी केले पाहिजे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयात येण्यासाठी प्रवृत्त करा, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. 

कार्यशाळेचा उद्देशआपल्या लायब्ररी या नॅक दर्जाच्या कशा झाल्या पाहिजेत. ग्रंथालयाचा दर्जा चांगला असला पाहिजे. सध्याची पिढी ही मोबाइलाचा वापर जास्त करतात. त्यांच्यात वाचनाची गोडी लागावी. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना काय सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. ग्रंथालयात मासिके, जुनी पुस्तके आणणे, नवीन  पुस्तके आणणे, ती पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत  पोहोचविणे, नवीन योजनांची विद्यार्थ्यांना माहिती देणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेणे, महाविद्यालयाच्या वॉल मॅगेझिन आणि वेबसाइटवर नवीन माहिती टाकली जावी या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. 

कार्यशाळेतून साध्य काय होईल?या कार्यशाळेत प्रत्येक ग्रंथपालांकडून काही नवीन आयडिया येत असतात. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात नवीन प्रकल्प काय राबविले असतील तर त्यांची माहिती मिळते. सर्वजण एकत्रित आल्याने एखादी आयडिया आवडल्यास महाविद्यालयाच्या प्राचार्याशी चर्चा करून तिची अंमलबजावणी केली जाऊ शकते. शंका निरसन या कार्यशाळेतून होत असल्याचे प्राचार्य महाजन यांनी सांगितले. 

टॅग्स :libraryवाचनालय