शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर रस्त्यात रुतल्याने राज्यमार्ग बंद, कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:22 IST

कर चुकविण्यासाठी करतात या रस्त्याचा वापर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचारी येथील सीमा तपासणी नाक्याचा  (आरटीओ) कर चुकविण्यासाठी धुंदलवाडी-हळदपाडा - मोडगाव-उधवा अशा आडमार्गाचा वापर केला जातो. या मार्गावर दोन अतिअवजड मशीन वाहून नेणारे ट्रेलर चिखलात रुतल्याने अपघात होऊन धुंदलवाडी - उधवा राज्यमार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद पडला आहे. यामुळे नागरिकांची तसेच इतर वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली असून, कोणताही शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी किंवा पोलीस प्रशासन रस्त्यावर आडवा झालेल्या वाहनास बाजू करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील दापचेरी येथे गुजरात तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर सीमा तपासणी नाके आहेत. येथून अवैधरित्या अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु अशी वाहतूक करणाऱ्या काही वाहतूकदारांना सीमा तपासणी नाका चुकवून आडमार्गाने सहीसलामत बाहेर काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काही टोळ्या कार्यरत आहे. खासकरून रात्रीच्या सुमारास ही चोरटी वाहतूक होत असते, मात्र या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कारवाई होत नसल्याने दरमहा सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान होते. काही महिन्यांपूर्वी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी ही चोरटी वाहतूक बंद करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु काही दिवसांनी पुन्हा तलासरी उधवा येथून मोडगाव-धुंदलवाडी-व सायवन-कासा-चारोटी अशी अवैध वाहतूक सुरू झाली.

दरम्यान, २४ जुलै रोजी मध्यरात्री धुंदलवाडी-उधवा  रस्त्यावरील मोडगाव खिंडीत एक अवजड ट्रेलर आडवा झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीच्या सामना करावा लागत आहे. राज्यमार्गावरील दळणवळण बंद झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथील आदिवासींना  त्रास सहन करावा लागत आहे.  

धुंदलवाडी-मोडगाव-उधवा हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. या रस्त्यावरून बेकायदा अवजड वाहने जात असतात. त्यासाठी अनेक मोर्चे, आंदोलन, उपोषण, केले. परंतु काही झाले नाही. धुंदलवाडी पोलीस या रस्त्यावरून जाणाऱ्या अवैद्य वाहनांना मज्जाव करीत नसल्याची खंत आहे. - काशीनाथ चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरMumbaiमुंबई