शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम जनजागृती मोहिमेला २७ डिसेंबरपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:53 IST

मतदारांच्या मनातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भात असलेल्या शंका दूर करण्यासाठी तसेच या मशिन्स किती निर्दोष आहेत, हे पटवून देण्यासाठी २७ डिसेंबरपासून पुढील दोन महिने जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम

ठाणे : मतदारांच्या मनातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंदर्भात असलेल्या शंका दूर करण्यासाठी तसेच या मशिन्स किती निर्दोष आहेत, हे पटवून देण्यासाठी २७ डिसेंबरपासून पुढील दोन महिने जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.२०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची २० डिसेंबर रोजी तपासणी झालेली आहे. त्यानुसार, पुढील टप्प्यात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी ३७ वाहने तैनात करण्यात आली असून यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. २६ डिसेंबर रोजी या मशिन्स बाहेर पडणार आहेत. मतदारांमध्ये या मशीनबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, हा या जनजागृतीचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याने कोणाला मत दिले आहे, याची स्लिप त्याला सात सेकंदांपर्यंत पाहता येणार आहे. नव्या मशीनचे हे वैशिष्ट्य आहे. या मोहिमेसाठी राजकीय पक्षांकडूनसुद्धा मदतीची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. या जनजागृती मोहिमेचा अजेंडा तयार करण्यात आला असून ज्या भागात कार्यक्रम घेतला जाईल, त्याची माहिती आधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्ह्याच्या मतदारयादीत ७७ हजार ४३६ कृष्णधवल छायाचित्रे होती, त्यापैकी १४ हजार ८६० छायाचित्रे रंगीत करण्यात आली असून ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.प्रत्येक वाहनावर जीपीएसजनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवली असून या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती होते अथवा नाही, याची माहिती घेतली जाणार आहे.प्रत्येक वाहन कुठे आहे, याची माहितीसुद्धा या जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकthaneठाणे