शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवांसाठी कोपर उड्डाणपूल सुरू न केल्यास रेलरोकोचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 13:37 IST

कोपर उड्डाणपूल बंद असल्याने डोंबिवलीकरांची परवड होत आहे.

 डोंबिवली - कोपर दिशेकडील उड्डाणपूलाचे काम चार महिने झाले तरीही महापालिकेने सुरु केले ना रेल्वेने सुरू केले आहे. ते ते सुरू होईल तेव्हा होऊ दे, पण तोपर्यंत नागरिकांनी, रुग्णांनी हाल सहन करायचे का? पुलाचा काही भाग तातडीने सुरू करावा. अत्यावश्यक सेवांसाठी पुलाचा काही भाग सुरू  करून काम सुरू  करावे अन्यथा रेल रोको करू, असा सज्जड इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. मंगळवारी म्हात्रे यांनी कोपर पूलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी केली, त्या पाहणीत कसलेच काम सुरु नसून तो पूल वाहतूकीसाठी बंद केला असल्याचा संताप आल्याने म्हात्रेंनी थेट रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली. रेल्वे अधिकारी, पोलिस यांच्यासमोरच पूल अत्यावश्यक सेवांसाठी खुला करा अन्यथा रेल्वे बंद करु असे सांगत त्रागा व्यक्त केला. ते म्हणाले की, एका गरोदर मातेला रिक्षा मिळत नव्हती, एका रिक्षा चालकाने अडचण बघूनही ठाकुर्ली उड्डाणपूलावरुन फिरुन जाण्यासाठी ३०० रुपये एवढे भाडे सांगितले.

त्यामुळे अखेरीस परवडणार नाही म्हणून त्या महिलेने पूलावरुन जाण्याचा निर्णय घेतला, अखेरीस ती महिला पूलावरतीच प्रसुती झाल्याची माहिती म्हात्रे यांना मिळाली. तसेच एका ज्येष्ठ रुग्णालादेखील शास्त्रीनगर रुग्णालयातून खोकला, दमा होता त्यासाठी औषधोपचारासाठी ठाण्याला जायचे होते, त्यालाही रिक्षा चालकाने अव्वाच्या सव्वा भाडे सांगितले, त्यामुळे तो ज्येष्ठ नागरिक रुग्ण पायी गेला, अवघ्या काही अंतरावर गेल्यावर तो तोल जाऊन पडला. पण जर त्याला वेळीच रुग्णवाहीकेची सुविधा मिळाली असती तर तो पडला नसता.

गेल्या काही दिवसातील या घटना आहेत. त्यामुळे त्याची नोंद रेल्वेने, महापालिका प्रशासनाने घ्यावी आणि तातडीने कोपर पूल दुचाकी, रिक्षा आणि रुग्णवाहीका यांसाठी खुला करावा. अन्यथा वेळ आल्यास रेल्वे बंद पाडू असा दम म्हात्रे यांनी रेल्वेला दिला. तसे पत्र देखिल म्हात्रे हे रेल्वे प्रशासनाला देणार असल्याचे म्हणाले. काम पण करत नाहीत, आणि पूल बंद करुन ठेवला ही कुठली पद्धत असेही म्हात्रे संतापाने म्हणाले.

अत्यावश्यक सेवांसाठी पूल खुला करायलाच लागेल, कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असा सज्जड दम त्यांनी रेल्वे अधिका-यांना दिला. महापालिका आयुक्तांशीही यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcentral railwayमध्य रेल्वेShiv Senaशिवसेना