शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम सुरू; मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:21 IST

अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा सुरक्षेच्या कारणावरून पुन्हा चर्चेत आला आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा सुरक्षेच्या कारणावरून पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. सोमवारी या रस्त्याचे काम सुरू झाले आहे; मात्र महामर्गाचे काम करताना अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच, रस्त्यासाठी खोदकाम करताना वाहतुकीने गजबजलेला रस्ता सुरक्षित करणे गरजेचे असतानाही त्याठिकाणी सुरक्षेसाठी दोरी किंवा बॅरेकेटिंग लावण्यात आलेले नाही. त्यामुळे बेसावध वाहन थेट खड्ड्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे.अंबरनाथमध्ये अडकून पडलेला कल्याण-बदलापूरमार्गे पुण्याला जोडणारा राज्य महामार्गाचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे. हे काम करताना अनेक ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी एकत्रित काम सुरू असून अस्तित्वातील रस्ता आणि नव्याने तयार करण्यात येणारा रस्ता यांच्यासाठी खोदण्यात येणारे खड्डे हे जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स, सूचना फलक लावणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी असे फलकच लावलेले नाहीत. विम्को नाका ते शंकर मंदिर, आयटीआयसमोरील रस्त्यांवरही अशीच स्थिती आहे. रस्त्याचे काम करीत सुरक्षेची जबाबदारी ही ठेकेदाराची असतानाही ठेकेदार या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे.सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत होते. जलवाहिनी स्थलांतरित होत नसल्याने काम करता येत नसल्याचे कारण पुढे केले जात होते. आता ठेकेदाराने परस्पर काम सुरू करून जलवाहिनीचे काँक्रीट खाली दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जलवाहिन्या स्थलांतरित होत नाहीत तोवर काम करता येणार नाही, असे सबब देणारे अधिकारीच आता या जलवाहिन्या काँक्रीट खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात जलवाहिनी फुटल्यास रस्ता खोदण्याची वेळ येणार आहे.जलवाहिनीच्या ठिकाणी भर टाकून कामफॉरेस्ट नाका परिसरात रस्त्याच्या एक फुटावर जलवाहिनी असल्याने काँक्रीटचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे आता त्याच्यावर वाढीव माती भराव करून हा रस्ताच वर उचलण्यात येत आहे. त्यामुळे शेजारी असलेली दुकाने किंवा कंपन्या या रस्त्यापासून खाली गेल्या आहेत. अधिकारी या अडचणी न सोडवताच रस्त्याचे काम उरकण्याचा प्रयत्न करत आहेत. उल्हासनगर महापालिका, जीवनप्राधिकरण, अंबरनाथमधील एका बड्या बिल्डरची जलवाहिनी ही याच मार्गावरून गेली आहे. ती स्थलांतरित न करताच काम सुरू केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाthaneठाणे