शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

लोकग्रामचा पादचारी पूल पाडण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:37 IST

कल्याण : पूर्व भागातील कल्याण रेल्वे स्थानक ते लोकग्राम संकुलाला जोडणारा व धोकादायक झालेला लोकग्राम पादचारी पूल अखेर पाडण्यास ...

कल्याण : पूर्व भागातील कल्याण रेल्वे स्थानक ते लोकग्राम संकुलाला जोडणारा व धोकादायक झालेला लोकग्राम पादचारी पूल अखेर पाडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन पुलाच्या कामाला लवकर सुरुवात केली जाईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

नव्याने बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. लोकग्राम पादचारी पूल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ मधून रेल्वे यार्डातून पूर्वेतील लोकग्राम संकुलात जातो. मात्र, हा पूल धोकादायक झाल्याने तो रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाचे काम लवकर मार्गी लावण्यासाठी शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.

पुलाच्या बांधणीसाठी ७८ कोटी रुपयांचे प्राकलन आहे. पुलासाठी पुरेसा निधी कल्याण-डोंबिवली मनपाकडे नसल्याने तो स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी खासदार आग्रही होते. हा निधी स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध करून देत तो रेल्वेकडे वर्ग करण्यात आला आहे. पूल पाडण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. तर, शुक्रवारपासून पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. हे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होईल. मात्र, नव्या पुलाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे, यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पुलाचे पाडकाम व नवे काम हे हैदराबाद येथील कंपनीला मिळाले आहे. नावेद इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम सबकॉन्ट्रॅक्ट करार तत्वावर दिले आहे.

--------------------