शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्टार कासवांची तस्करी : आणखी दोघांना मुंबईतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:46 IST

अंगावर स्टार असलेल्याा कासवांसह वेगवेगळया प्रजातींच्या कासवांची तस्करी करणाऱ्या सलमान खान आणि शाह शेख या दोघांना मुंबईच्या मालवणी भागातून ठाण्याच्या वनविभागने १४ कासवांसह अटक केली.

ठळक मुद्दे ठाणे वनविभागाची कारवाई दोघांकडून १४ कासवांची सुटकामालवणीतील दुकानातून करीत होते विक्री

ठाणे : दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या सलमान रहिमतअली खान (२३) आणि शाह आलम जमील अहमद शेख (३८, रा. दोघेही मालवणी, मालाड) या दोघांना ठाण्याच्या वनविभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून १४ कासवांची सुटका करण्यात आली आहे. या दोघांसह आठवडाभरात कासवांच्या तस्करीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.मुंबईच्या मालाड पश्चिम भागातील केजीएन आणि तयबा या पेट शॉपमध्ये काही कासवे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवल्याची गुप्त माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक आणि ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप देशमुख यांच्या पथकाने १२ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून मालवणी भागातून या दोघांना अटक केली. वनअधिका-यांनी बनावट गि-हाइकाला सलमानच्या दुकानात पाठवून या कासवांची मागणी केली. तेव्हा ही कासवे देताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये सलमानकडून सहा तर शाह याच्याकडून आठ अशी १४ कासवे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव