शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करावी; इटंकची मागणी

By अजित मांडके | Updated: February 5, 2024 15:29 IST

विभागीय कार्यशाळा येथे एक काळ असा होता की  ४०० यांत्रिक कर्मचारी कार्यरत होते.

ठाणे :  ठाणे एसटीच्या विभागीय कार्यशाळेत म्हणजेच यांत्रिक विभागात ४०० पैकी अवघे १०० कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांवरील कामाचा ताण अधिक वाढला असून या विभागातील कर्मचाºयांची भरती करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. महामंडळाने तातडीने लक्ष देउन यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल असे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस युनियन च्या ठाणे विभागा वतीने ठाणे विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे.

विभागीय कार्यशाळा येथे एक काळ असा होता की  ४०० यांत्रिक कर्मचारी कार्यरत होते. आज परिस्थिती अशी आहे की त्यापैकी फक्त १०० च्या आसपास कर्मचारी उरलेले  आहेत. दरम्यान च्या काळात अनेकजण सेवानिवृत्त झाले ,काहींनी दुसऱ्या विभागात बदली घेतली,काही महत्त्वाचे असे यांत्रिक विभाग असे आहेत की तिथे दोन ते तीनच कर्मचारी उरलेले आहेत. यांत्रिक काम हे पार काटेकोरपणे केले जाते त्यात यांत्रिक काम प्रचंड अंगमेहनतीचे असुन कमी मनुष्यबळात दडपशाही करुन प्रशासनाकडून ते करून घेतले जाते, काही कारणास्तव नियोजित काम वेळेवर झालं नाही तर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य त्यामुळे खचलेले आहे. महामंडळाने यांत्रिक विभाग कधीच अद्यवत करण्याचा प्रयत्नच केला नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला किंबहुना यांत्रिक विभाग हा एसटीतील महत्त्वाचा विभाग असताना तो नेहमी दुर्लक्षितच राहिलेला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य एस टी.वर्कर्स काँग्रेसचे ठाणे विभाग अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केला आहे.

आगार पातळीवर ही कर्मचारी फार कमी प्रमाणात आहेत. उरलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेकजण सेवानिवृत्ती कडे झुकलेले आहेत.यांत्रिक विभागात तातडीने नोकर भरती करणे गरजेचे असल्याचे इंटक ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाल्याचे  शिंदे यांनी सांगितले व यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ठाणे विभाग नियंत्रकांनी  पुढे प्रयत्न करावेत यासाठी निवेदन देत असून यांत्रिक भरतीचा प्रश्न राज्यात सर्वत्रच सारखा असुन इंटक सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या प्रश्नावर पाठपुरावा केला जाईल वेळप्रसंगी आंदोलनात्मक भुमिका घेण्यात येईल अशा इशारा देखील पत्रात देण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणे