शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाची आंतरराज्य बससेवा सुरू; प्रवासी अन् उत्पन्नही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:44 IST

ठाण्यातील विविध भागांत रोज ४५० च्या आसपास बस या २६७ मार्गांवर धावत आहेत.

अजित मांडके ठाणे : अनलॉकनंतर आता आंतरराज्य बससेवा सुरू झाली आहे. या सेवेला मध्यम प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा सुरू करताना अत्यावश्यक सेवाही दिल्याने प्रवाशांना त्याचा फायदा झाला आहे. असे असले तरी त्यांची संख्या आजही कमी असल्याने उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.

ठाण्यातील विविध भागांत रोज ४५० च्या आसपास बस या २६७ मार्गांवर धावत आहेत. पूर्वी रोज एक लाख ७६ हजार किमीचा प्रवास त्यांचा होत होता. तो आज एक लाख ५४ हजार किमीच होत आहे. पूर्वी रोज सरासरी एक लाख ६७ हजार प्रवासी लाभ घेत होते. परंतु, आता कोरोनामुळे ही संख्या एक लाख २० हजार आहे. तर, दिवसाचे पूर्वीचे उत्पन्न हे ७६ लाख होते. ते आता ४८ लाखांच्या घरात आले आहे. त्यातही लोकल पूर्णत: सुरू झालेली नसल्याने प्रवाशांची संख्या कमी असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. 

आंतरराज्य गाड्यांना मिळताे अल्प प्रतिसाद

  • आंतरराज्य गाड्यांना सध्या मध्यम प्रतिसाद मिळत आहे. त्यातही, आता कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात असल्याने प्रवाशांनी पुन्हा काही प्रमाणात एसटीकडे पाठ फिरविली आहे. तरीही, इतर ठिकाणांच्या तुलनेत प्रवाशांची संख्या तशी फारशी कमी झालेली नाही.
  • दरम्यान, ४५० बस असल्या तरी त्यातील १३० या महाराष्ट्र राज्यातील असून इतर राज्यांच्या चार आणि ठाणेअंतर्गत ३१६ बस या विविध मार्गांवर धावत आहेत. इतर राज्यांमध्ये भिवंडी ते विजापूर, ठाणे ते बेळगाव, ठाणे ते गाणगापूर व ठाणे ते हैदराबाद या बसचा समावेश आहे.
  • अनलॉकनंतर हळूहळू एसटीसेवा पूर्वपदावर येत आहे. प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आंतरराज्यांबरोबरच आंतरजिल्हादेखील प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. अत्यावश्यक सेवाही सुरू आहे. - विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे
टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या