शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गणेशोत्सवासाठी एसटीच्या बस गेल्या कोकणात; डोंबिवलीकर वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 12:27 IST

कल्याण शिळ रस्त्यावरही वाहतूक कोंडी

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मागणी वाढल्याने राज्य परिवहनच्या बसेस कोकणात विविध मार्गावर पाठवण्यात आल्या असून त्याचा परिणाम डोंबिवलीकर चाकरमान्यांचा प्रवासाच्या नियोजनावर झाला आहे. येथील बस फेऱ्या कमी झाल्या असून प्रवाशांची रांग वाढता वाढत आहे. आधी खासगी कर्मचा-यांसाठी रेल्वे सेवा सुरु नाही, त्यात बस फे-या अचानक कमी झाल्याने चाकरमान्यांची सोमवारी सकाळी त्रेधातिरपीट उडाली होती.

बसची वाट पहात उभ्या असलेल्या रांगा इंदिरा गांधी चौकातून सुरु होऊन बाजीप्रभु चौक, फडके पथ ते फतेह अली रस्त्यापर्यंत पोहोचल्या होत्या. शेकडो नागरिक त्यामुळे ताटकळले होते. बस येत नसल्याने राज्य परिवहन मंडळाचे नियंत्रक, अन्य कर्मचारीही प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तर तरी काय देणार यापेचात अडकले होते. पहाटे ६ वाजल्यापासून रांगा लागलेल्या होत्या. विशेषत: मंत्रालयमार्गावर जाणा-या गाड्यांची संख्या रोडावली असल्याने समस्येत वाढ झाली होती. काही प्रवाशांनी ठाणेपर्यंत जाऊन तेथून पुन्हा बसची रांग लावून मुंबई गाठण्याचा पर्याय निवडला होता, तर काहींनी डोंबिवलीतच बसची वाट बघणे पसंत केले होते. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत रांगा काही केल्या कमी झालेल्या नव्हत्या. त्यामुळे परिवहन मंडळाच्या कर्मचा-यांवर मात्र तणाव पडला होता. गणेशोत्सवात गाड्या सोडा पण आता जे नियोजन दोन महिन्यांपासून सुरु आहे त्याला फाटा देऊ नका. लोकल सेवा सगळयांसाठी सुरु झाल्यावर बस वाहतूकीकडे आपोआप मागणी कमी होईल, पण तोपर्यंत महामंडाळाने डोंबिवलीकरांना वा-यावर सोडू नये अशी मागणी रांगेत ताटकळलेल्या महिलांनी केली.

त्यात काही बस सकाळच्या वेळेत कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. पलावा जंक्शन, मानपाडा जंक्शन येथे वाहतूक कोंडी झाली होती. आठवडाभर झालेल्या पावसामुळे कल्याण शीळ रस्ताची चाळण झाली आहे. वाहतूकीचा वेग मंदावला असून त्याकडे वाहतूक पोलीसांचे आणि रस्त्याच्या कामाकडे राज्य रस्ते नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने कोंडीचे प्रमाण वाढले असल्याची टिका वाहनचालकांनी केली.

आता तर अजून पूर्ण वाहतूक सुरु झालेली नसून जेव्हा ती होईल तेव्हा तर कहर होईल. सध्या पलावा ते शीळफाटा अवघ्या १२ ते १५ मिनिटांसाठी सुमारे दिड दोन तास लागत आहेत. त्याची दखल घेत ही वाहतूक कोंडी व रखडलेली खड्डे बुजवण्याची कामे यासंदर्भात आमदार प्रमोद पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिका-यांची शुक्रवारी भेट घेतली होती परंतू तरीही अद्यापर्यंत काहीही फरक पडला नसल्याने अधिका-यांमध्ये इच्छाशक्तीचा आभाव असल्याची टिका नागरिकांनी केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणेGanesh Mahotsavगणेशोत्सव