शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम समुद्र याच्या कोठडीत वाढ, सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 06:10 IST

बदलापूरच्या बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला मंगळवारी कल्याण न्यायालयात पुन्हा हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

बदलापूर : बदलापूरच्या बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला मंगळवारी कल्याण न्यायालयात पुन्हा हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. १६ मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, इतर दोघांना २७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.बदलापूरमध्ये सागर इन्व्हेस्टमेंटच्या नावावर भरीव व्याजदराचे आमिष दाखवत, शेकडो गुंतवणूकदरांची १५० कोटींहून अधिकची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात श्रीराम समुद्र, त्याची पत्नी अनघा वर्षभरापासून बेपत्ता होते. गुंतवणूकदारांनीही या दोघांना ताब्यात घेण्यासाठी सातत्याने आंदोलने, निदर्शने केली. दोघेही न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी फिरत होते. अखेर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळताच त्यांनी शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यात श्रीराम, अनघा यांच्यासोबत नातेवाईक कैवल्य समुद्र आणि सुप्रीती समुद्र यांचा समावेश होता. या चौघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता श्रीराम आणि अनघा यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली. तर कैवल्य, सुप्रिती यांना २७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.>गुंतवणूकदारांची यादी मिळविण्याचा प्रयत्नश्रीराम यांच्याकडे गुंतवणूकदारांची सर्व यादी असल्याने ती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. बदलापूरमधील अनेक बड्या व्यक्तींनीदेखील त्यांच्याकडे गुंतवणूक केलेली होती. मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतविल्याने त्याचाही तपास पोलीस करत आहेत.